आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-ट्यूब चॅनल लाेकप्रिय करायचेय? वापरा हे फंडे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ २४ वर्षे वय असलेला रजत तिवारी हा एक प्रसिद्ध यू-ट्यूबर अाहे. त्याचे यू-ट्यूब चॅनल "बॉलीवूड म्युझिक'चे ९ लाख ७०,००० सब्स्क्रायबर्स व २० काेटी प्रेक्षक अाहेत. गतवर्षी त्याला यू-ट्यूबचा 'सिल्व्हर क्रिएटर' पुरस्कार मिळाला अाहे. या शिखरापर्यंत पाेहाेचण्यासाठी रजतने खूप परिश्रम घेतले अाहेत. आज ताे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अलीबाबा, मसराटी, रेडिसन ब्ल्यू अादी माेठ्या कंपन्यांचे ब्रंॅड सोशल मीडियावर प्रमोट करताे. यू-ट्यूबर म्हणून स्वत:ची सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी रजतने काही खास टिप्स दिल्या अाहेत... 


अशी करा सुरुवात 
स्वत:चे चॅनल सुुरू करताना मला यू-ट्यूबवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या मुद्द्यांत संगीत हा मुद्दा असल्याचे दिसून अाले. त्या वेळी संगीतात ओरिजनल कंटेंट नसल्याने अाम्ही ज्यूक बॉक्सेस बनवले, ज्यात बॉलीवूडची गाणी सतत सुरू असत. त्या वेळी असे काेणीही करत नव्हते. वेगळी कल्पना हीच यशाची पहिली अट अाहे. त्यामुळे संकल्पना निवडल्यावर 'यू-ट्यूब डॉट कॉम'वर जाऊन चॅनल तयार करा. त्यात चॅनलचे नाव, युजर नेम प्रोफाइल पिक्चर, कव्हर पिक्चर लावा. १०,००० व्ह्यूज आल्यानंतर तुमचे उत्पन्न सुरू होईल. 


व्हायरलसाठी लागेल वेळ 
पहिला व्हिडिअाे टाकल्यानंतर दुसरा व्हिडिअाे अपलोड करताना कार्ड‌्स व एंड स्क्रीन एनोटेशन्ससह पहिला व्हिडिअाेे लिंक करू शकता. सब्स्क्रायबर्स बटणही त्या व्हिडिअाेत एम्बेड करू शकता. व्हिडिअाे टाकल्यानंतर सर्चमुळे ट्रॅफिक निर्माण हाेण्यासाठी काही वेळ लागताे. १० ते ५० व्हिडिअाेंमधून एखादा व्हायरल होईल. त्यामुळे तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तथापि, एक व्हिडिअाे व्हायरल झाल्यानंतर अगाेदरपासून झालेल्या लिंकिंगमुळे तुमचे सब्स्क्रायबर्स वाढतील; परंतु त्यासाठी वेळ लागेल. 


या काही विशेष टिप्स 
सर्वप्रथम टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्ज लक्षपूर्वक लिहा. यात प्रासंगिकता गरजेची अाहे. तसेेच थम्ब नेल इमेजही आकर्षक असावी. तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत नसेल तर अॅडोब स्पार्क नामक संकेतस्थळावर पैसे खर्च न करता थम्ब नेल इमेज तयार करू शकता. अापल्या मुद्द्याशी संबंधित की-वर्ड‌्स वापरा. व्हिडिअाे डिस्क्रिप्शन कमीत कमी १५० शब्दांचे असावे. एखाद्या उत्तम दर्जाच्या मोबाइलनेच व्हिडिअाे शूट करावेत असे गरजेचे नाही. सामान्य स्मार्टफोननेही व्हिडिअाे बनवू शकता. तसे करू इच्छित नसाल व केवळ मजकूर-साहित्य तयार करू शकत असाल तर 'https://lumen5.com/'ची मदत घ्या. अॅनिमेटेड व्हिडिअाेेंसाठी 'https://www.powtoon.com/' वापरू शकता. "हाऊ टू' व "थिंग्ज टू डू' सारखे व्हिडिअाे सहजपणे बनतात व खूप पाहिले जातात. त्यामुळे अशा व्हिडिअाेंवरही काम करू शकता. 


प्रमोशनच्या पद्धती... 
सोशल मीडियावर शेअर करण्याशिवाय व्हिडिअाेंची बॅकलिंकिंग करा. कोरा, याहू आन्सर्सवर प्रश्नांची उत्तरे देत व्हिडिअाेंची लिंक शेअर करू शकता. सब्स्क्राइब बटणाच्या उजवीकडील बेल आयकन दाबल्याने युजरला प्रत्येक व्हिडिअाेचे नोटिफिकेशन जाईल. त्यासाठी व्हिडिअाेच्या शेवटी सब्स्क्राइब करण्यासह बेल आयकनही प्रेस करण्याबाबत रिक्वेस्ट करू शकता. साेबतच व्हिडिअाेच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करून त्यास पिन-टू-टॉप करा. त्यामुळेही व्ह्यूज वाढतील. 

 

बातम्या आणखी आहेत...