आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणसारखी वेडिंग ज्वेलरी घ्यायची असेल तर या मार्केटला नक्की भेट द्या.. उपलब्ध आहे स्वस्त पर्याय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी दीपिका पदुकोण नुकतीच विवाहाच्या बंधनात अडकली. तिने अभिनेता रणवीर सिंहसोबत सातफेरे घेतले. दीपवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

दीपिका पदुकोण हिच्या मेकअपसोबत तिच्या दागिन्यांची सर्वत्र चर्चा आहे. दीपिका पादुकोण, सोनम कपूर किंवा अनुष्का शर्मा यांच्यासारखी वेडिंग ज्वेलरी खरेदी करायची तुमचीही इच्छा असेल तर या मार्केटला भेट देऊ शकतात.  येथे 250 ते 3000 रूपयांपर्यंत डिझायनर ज्वेलरी सहज उपलब्ध होते.


रुई मंडी, दिल्ली
> सेंट्रल दिल्लीतील चांदणी चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि खारी बावली येथील बाजार देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वांत मोठे होलसेल मार्केट आहे. या बाजारात रुई मंडी आर्टिफिशअल ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे एका नेकलेसचे 1000 नग मिळतील. येथे रिटेलच्या तुलनेत 50 टक्के कमी किमतीत दागिने मिळतात.

 

सदर बाजार मार्केट असोशिअशनचे अध्यक्ष ताराचंद गुप्ता यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील रिटेलर्स तसेच ग्राहक दागिने खरेदी करण्यासाठी येथे येतात. फॅक्टरीत तयार केलेले प्रॉडक्ट्स सर्वात अगोदर या बाजारात येतात. ग्राहकांना येथे होलसेल दरात दागिने उपलब्ध होतात.

 

जोहरी बाजार, जयपूर
> लग्नच्या खरेदीसाठी राजस्थानचा जोहरी बाजार दागिन्यांचे मोठे केंद्र आहे. जयपुरचा ज्वेलरी बाजार दिल्लीतील चांदनी चौकसारखाच आहे. अरुंत आणि गर्दीच्या रस्त्यांत ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. जोहरी बाजारचा वार्षिक टर्नओव्हर 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. येथे सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. हा बाजार कुंदन ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे दागिन्यांची किंमती रिटेलच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी कमी आहेत.

 

इतर मार्केटविषयी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...