आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामच नव्हे, संपूर्ण देशातून घुसखाेरांना बाहेर काढू इच्छिताे : गृहमंत्री अमित शहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

vidhaगुवाहाटी : केंद्र सरकार केवळ आसाममध्येच नव्हे, तर संपूर्ण देशातून घुसखाेरांना बाहेर काढू इच्छित असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. आसामच्या दाेन दिवसांच्या दाैऱ्यावर आलेल्या शहा यांनी साेमवारी दुसऱ्या दिवशी ईशान्य लाेकशाही आघाडी(एनईडीए)च्या चाैथ्या परिषदेत हे वक्तव्य केले. त्यांनी काँग्रेसच्या मागील सरकारांवर ईशान्येस देशाच्या उर्वरित भागापासून वेगळे पाडल्याचा आराेपही केला. काँग्रेसने या भागाचा विचार केला नाही. त्यामुळे हा प्रदेश दीर्घकाळापासून कट्टरवादाच्या समस्येशी झगडत आहे. काँग्रेसच्या सरकारांनी ईशान्येत संघर्षाचे बी पेरले हाेते. काँग्रेसचे धाेरण नेहमी 'फाेडा आणि राज्य करा' राहिले असल्याचा आराेप शहा यांनी केला. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करण्याचा उल्लेख करत सांगितले की, कलम ३७० तात्पुरती तरतूद हाेती, ईशान्य राज्यांना विशेष दर्जा देणारे कलम ३७१ विशेष तरतूद आहे. त्याला काेणीही स्पर्श करू शकत नाही. शहा यांनी सद्य:स्थितीतील सीमेचा उल्लेख करत सांगितले की, सीमेवर ज्या प्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रकार सुरू आहे, त्यावर सरकार कारवाई करत आहे. दरम्यान, शहांसमाेर ईशान्य राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चिंता व्यक्त केली. मेघालयाचे मुख्यमंत्री काेनराड संगमांनी ईशान्येतील सर्व राज्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली.  

बातम्या आणखी आहेत...