आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC च्या या पॉलिसीचा पैसा तुम्हाला बनवेल करोडपती, असे करा प्लॅनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- LIC ची पॉलिसी ही मुख्यत: जीवन विमा म्हणून खरेदी केली जाते. पण योग्य रितीने प्लॅनिंग केल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळून तुम्ही करोडपतीही बनू शकता. एलआयसीची ही पॉलिसी आहे जीवन अक्षय VI, ज्यात केवळ एका वेळीच प्रीमियम द्यावा लागतो. ही पॉलिसी तुम्हाला जीवनभर फिक्स उत्पन्न देईल. याशिवाय तु्म्हाला विम्याचे संरक्षणही मिळेल. ही पॉलिसी तुम्हाला दरमहा, तिमाही, 6 महिने आणि वार्षिक आधारावर परतावा देते. तुम्ही जर दर महिन्याला परताव्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला गुंतवणूक केल्याच्या दुसऱ्या महिन्यापासूनच परतावा मिळू लागेल.

 

पॉलिसी कशी करेल गुंतवणूकीसाठी पैशाची व्यवस्था
ही पॉलिसी जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करुन घ्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड लाखाची गुंतवणूक करावी लागेल. पण तुम्हाला ट्रेडिशनल प्लॅन घ्यायचा असेल तर कमीत कमी एक लाखाची गुंतवणूक करावी लागेल. एक लाखाच्या गुंतवणूकीवर तुम्हाला दरवर्षी 6410 रुपये ते 6750 रुपये इतका परतावा मिळेल. उत्पन्नातील हे अंतर तुम्ही कोणता पर्याय स्वीकारता यावर अवलंबून आहे यावर आहे. जर तुम्ही या योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक साधारणत: 32500 रुपये मिळतील. अशा रितीने तुम्हाला दरमहा 2500 रुपये मिळतील.

 

या पैशाची गुंतवणूक तुम्हाला करेल करोडपती 
जर एखादी व्यक्ती 30 व्या वर्षी एलआयसीत गुंतवणूक करत असेल तर तिच्याकडे गुंतवणूकीसाठी 30 वर्षांचा कालावधी असतो. तुम्ही एखाद्या चांगल्या म्युचुअल फंडात दरमहा अडीच हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला 30 वर्षात ते वाढून तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील. अशा रितीने तुम्हाला चांगले विमा कव्हरही मिळेल आणि तुमच्याकडे तुमची अन्य बचतही असेल आणि शिवाय एक कोटी रुपयेही असतील. चॉईस ब्रोकिंगचे अध्यक्ष अजय केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार इक्विटी फंड दीर्घकाळात तुम्हाला चांगला रिटर्न देतात. सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी लार्ज कॅप फंड उत्तम मानले जातात. या कॅटिगरीतील टॉप 5 फंडात दरवर्षी सुमारे 22 टक्के परतावा मिळतो. जर गुंतवणूकीचा कालावधी वाढवला तर आणखी चांगला परतावा मिळतो.


गुंतवणूकीची योजना
- 2500 ची दरमहा करा गुंतवणूक
- 30 वर्ष गुंतवणूक करण्याचा कालावधी
- त्यावर मिळेल सुमारे 13 टक्क्यांचा परतावा
- एक कोटीचा तयार होईल फंड

 

टॉप 5 लार्ज कॅप MF स्‍कीम्‍स

 

स्‍कीम

5 वर्षाचा परतावा

रिलायन्स व्हिजन फंड (D)

39.2 टक्के

एल अॅण्ड टी लार्ज कॅप फंड (G)

36.3 टक्के

एस्‍कोर्ट्स लीडिंग सेक्‍टर फंड Direct (G)

25.0 टक्के

कोटक सिलेक्‍ट फोकस फंड Direct (G)

23.7 टक्के

जेएम मल्‍टी स्‍ट्रॅटजी फंड -Direct (G)

22.4 टक्के

नोट : डाटा 9 एप्रिल 2018 चा आहे. रिटर्न CAGR मध्ये दर्शविण्यात आलेल्या सरासरी परताव्याप्रमाणे

 

वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत घेऊ शकता पॉलिसी

या योजनेत 7 पध्दतीचे पर्याय मिळतात. तुम्ही यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. तुम्ही एजंटमार्फत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला कमीत कमी एक लाखाची गुंतवणूक करावी लागेल आणि ऑनलाईन खरेदी केल्यास कमीत कमी दीड लाखाची गुंतवणूक करावी लागेल. या पॉलिसीत जास्तीत जास्त गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसी 30 वर्षापासून 85 वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती घेऊ शकते. या पॉलिसीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्सच्या 80 C नियमातंर्गत सुट मिळू शकते. ही पॉलिसी सरेंडर करता येत नाही. या पॉलिसीच्या आधारे तुम्हाला कर्जही मिळू शकत नाही.


पुढे वाचा: काय आहेत गुंतवणूकीचे नियम...

 

बातम्या आणखी आहेत...