आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'War' Earns Rs 166.25 Crore For Its First Weekend, The 5th Highest Grossing Film Of The Year

'वॉर'ची पहिल्या विकेण्डला 166.25 कोटींची दणदणीत कमाई, ठरला वर्षातील 5 वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेला हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. या बॉलीवूड पटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 150 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. रविवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 166.25 कोटींची कमाई केली. त्यापैकी 159.70 कोटी रुपये हिंदी व्हर्जनने तर 6.55 कोटी रुपये तामिळ आणि तेलुगु व्हर्जनने कमावले आहेत.   

प्रत्येक दिवसाचे कलेक्शन

दिवस हिंदी व्हर्जनची कमाई  तामिळ+तेलुगु व्हर्जनची कमाईएकुण कमाई 
बुधवार 51.60 कोटी 1.75 कोटी  53.35 कोटी
गुरुवार  23.10 कोटी  1.25 कोटी  24. 35 कोटी
शुक्रवार  21.30 कोटी 1.15 कोटी   22.45 कोटी
शनिवार 27.60 कोटी 1.10 कोटी 28.70 कोटी
रविवार 36.10 कोटी  1.30 कोटी 37.40 कोटी
एकुण कलेक्शन  159.70 कोटी 6.55 कोटी 166. 25 कोटी

2019 चा 5 वा हाइएस्ट ग्रॉसर
चित्रपटातील टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांची अॅक्शन दृश्ये प्रेक्षकांना थक्क करणारी आहेत. दोघांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रिलीजच्या 5 दिवसांतच 2019 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. 

हे आहेत 2019 चे टॉप 5 बॉलीवूड चित्रपट
 

रँक चित्रपट रिलीज डेट लाइफ टाइम कलेक्शन
1 कबीर सिंह   21 जून 278.24 कोटी रुपये 
2 उरी : द सर्जिकल स्ट्राइक   11 जानेवारी   244.06 कोटी रुपये
3 भारत   5 जून   209.36 कोटी रुपये
4 मिशन मंगल   15 ऑगस्ट   200.16 कोटी रुपये
5 वॉर (फक्त हिंदी व्हर्जन)  2 ऑक्टोबर 159.70 कोटी रुपये (कमाई सुरु आहे)

 

टायगर श्रॉफचा ठरला हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट
'वॉर' चित्रपटाचे भारतातील एकुण कलेक्शन 166.25 कोटी रुपये (हिंदी+तामिळ+ तेलुगु) बघता हा चित्रपट टायगर श्रॉफच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी त्याचा 'बागी 2' हा चित्रपट 166 कोटींच्या कलेक्शनसोबत या यादीत आघाडीवर होता.