आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिडवेची लढाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिडवेची लढाई दुस-या महायुद्धादरम्यान पॅसिफिक महासागरात झालेली सागरी लढाई होती. 1942 मध्ये 4 जून ते 7 जूनपर्यंत मिडवे बेटावर ताबा मिळवण्यासाठी लढल्या गेलेल्या या लढाईत अमेरिकन नौसेनेने जपानी इंपीरियल नेव्हीवर निर्णायक विजय मिळवत जपानी सैनिकांचे जबरदस्त नुकसान केले. 1942 मध्ये जपान प्रशांत महासागरात विस्तार करीत होता. मलेशिया, सिंगापूर, डच ईस्ट इंडीज, फिलिपाइन्सव्यतिरिक्त अनेक बेटांवर जपानने ताबा मिळवला होता. त्याच्या या मोहिमेने अमेरिकेला सर्वात मोठा धोका निर्माण झाला होता. जपानी अ‍ॅडमिरल इसोरुकू यामामोटोने होनोलुलूपासून 1 हजार मैल दूर मिडवे बेटांवर अमेरिकन जहाजांना घेराव घालून नष्ट करण्याची योजना बनवण्यात आली होती.