आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

युवासेनेकडून पोस्टरबाजी; अदित्य ठाकरेच्या सफाई करतानाच्या फोटोसोबत नितेश राणेंचा चिखल अंघोळीचा फोटो व्हायरल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोवा रस्त्याच्या दूरवस्थेमुळे उपअभियंत्याच्या अंगावर चिखल ओतून त्यांना बांधण्याचा प्रयत्न केल्यामुळे आमदार नितेश राणे सध्या पोलिस कोठडीत आहेत. नितेश राणे कोठडीत असल्यामुळे सोशल मीडियावर युवासेनेकडून अनेक मेसेज शेअर केले जात आहेत. युवासेनेच्या मेसेजमध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे चिखलात उतरुन घाण साफ करताना दिसत आहेत, त्याची तुलना नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातलेल्या चिखलाच्या आंघोळीशी केली जात आहे.

 

 


युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फेसबुकवर फोटो शेअर केले आहेत. फोटोत एका बाजूला आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वर्सोव्हा बीचवर चिखलात उतरुन केलेली सफाई, तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना घातलेली चिखलाची आंघोळ दाखवली आहे. या फोटोसोबत "चिखल इथेही आहे, चिखल तिथेही होता, पण तो गजाआड आहे, हा मनाआड" असे कॅप्शन लिहिले आहे. 

 

नितेश-अदित्य वाद
नितेश राणे यांचे वडील खासदार नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद पेटला होता. अनेकदा दोघांमध्ये वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले होते. काही वर्षांपूर्वी वरळी परिसरात ओव्हरटेक करण्यावरुन नितेश आणि आदित्य यांच्यात वाद झाला होता. त्यानंतरही अनेकदा त्यांच्यात खटके उडाले आहेत.


आदित्य ठाकरेंकडून वर्सोव्हा बीचची साफसफाई
आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून वर्सोव्हा बीच साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. नुकतेच आदित्य यांनी युवासेनेच्या 500 कार्यकर्त्यांसह वर्सोव्हा बीचची सफाई केली. आदित्य ठाकरेंनी स्वत: तीन तास साफसफाई केली. आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातही वर्सोवा किनाऱ्याची सफाई केली होती. त्यानंतर पुन्हा कालच्या रविवारी त्यांनी वर्सोवा बीच स्वच्छता केली. बीचवरील प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोलसह अन्य कचरा स्वत: आदित्य ठाकरेंनी उचलला. 

0