Home | Gossip | 'War' poster released in three languages, Tiger-Hrithik challenges each other on Instagram

तीन भाषांमध्ये रिलीज झाले 'वॉर' चित्रपटाचे पोस्टर, टायगर-ऋतिकने इंस्टाग्रामवर एकमेकांना केले चॅलेंज 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 12, 2019, 03:13 PM IST

आर्कटिक सर्कलमध्ये शूट होणारा पहिला चित्रपट आहे 'वॉर'

 • 'War' poster released in three languages, Tiger-Hrithik challenges each other on Instagram

  बॉलिवूड डेस्क : अॅक्शन फिल्म 'वॉर' चे नवे पोस्टर रिलीज केले गेले आहे. पोस्टरमध्ये ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हातात पिस्तूल घेऊन निशाना साधतांना दिसत आहेत. तसेच वाणी कपूर ग्लॅमरस पोजमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे पोस्टर इंग्लिश, तमिळ आणि तेलगु या भाषांमध्ये रिलीज केले गेले आहे, कारण चित्रपट तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. तो 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर केले आहे.

  टायगरने पोस्टर शेअर करून लिहिले, 'या वॉरमध्ये केवळ एकच विजेता असेल.'

  टायगरची इंस्टाग्राम पोस्ट...

  ऋतिकने केले टायगरला चॅलेंज...
  तसेच ऋतिकनेदेखील पोस्टर शेअर करून लिहिले, 'मी माझ्या शब्दांपेक्षा जास्त माझ्या अॅक्शनने उत्तर देईन. तुला 2 ऑक्टोबरला भेटेन.'

  ऋतिकची इंस्टाग्राम पोस्ट...

  आर्कटिक सर्कलमध्ये शूट होणारा पहिला चित्रपट आहे 'वॉर'...
  - डायरेक्टर सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात ऋतिक आणि टाइगर जबरदस्त अॅक्शन करतांना दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'वॉर' विश्व सिनेमाच्या इतिहासातील पहिला असा चित्रपट आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये शूट केला गेला आहे. या चित्रपटाच्या टीजरमध्ये खतरनाक स्टंट्स आणि अॅक्शन सीन्स दाखवले गेले आहेत.
  - ऋतिक आणि टायगरचा एक फाइट सीन फिनलँडमध्ये शूट झाला आहे. तो बर्फावर चालणाऱ्या एका एड्रिनालाइन पम्पिंग कारसोबत चित्रित केला गेला आहे. फिनलँडचा हा भाग आर्कटिक सर्कलमध्ये येतो.

 • 'War' poster released in three languages, Tiger-Hrithik challenges each other on Instagram
 • 'War' poster released in three languages, Tiger-Hrithik challenges each other on Instagram

Trending