आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुलराणीच्या आरोपीला फाशीच द्या; वर्ध्यात रणरागिणी उतरल्या रस्त्यावर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फुलराणीचा खटला ॲड. सत्यनाथन लढणार
  • फुलराणीचा भाऊ, कुटुंब मोर्चात सहभागी

आशीष एस पावडे

वर्धा - निष्पाप फुलराणीला जिवंत जाळण्याची दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्यात घडल्याने तिला वेळेत न्याय मिळावा तसेच आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यासाठी शहरातील शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास शांततापूर्ण वातावरणात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. वर्धा बंदला व्यवसायिकांनी प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली होती.या मोर्चांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांचा सहभाग होता. ३ फेब्रुवारी रोजी प्राध्यापिकेला हिंगणघाट शहरातील नंदोरी चौरस्त्याजवळ आरोपीने पेट्रोल टाकून पेटविले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून माणूसकीला काळिमा फासणारी असल्याचे  महिलांनी सांगितले. 

फुलराणीचा भाऊ, कुटुंब मोर्चात सहभागी :


पीडित फुलराणीच्या कुटुंबातील सदस्यांनी या जनआक्रोश मोर्चात सहभाग घेतला होता.  या वेळी कुटुंबीयांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त  केल्या. माध्यमांशी बोलताना पीडित फुलराणीच्या भावाला भावना अनावर झाल्या होत्या.फुलराणीचा खटला ॲड. सत्यनाथन लढणार

हिंगणघाट येथील फुलराणीचा खटला सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. प्रशांतकुमार सत्यनाथन हे
लढणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने त्यांची या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...