आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरे वृक्षतोडीदरम्यान कॉलनीतील एका आदिवासी पाड्यात सुखद बाब अनुभवायला मिळाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपेश कलंत्री   

मुंबई - आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत एकीकडे वेगवेगळ्या स्तरांवर संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे सरकार आपल्या विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगत आहे. पण सगळ्यात आरे कॉलनीतील खडकपाडा या आदिवासी पाड्यात एक सुखद बाब अनुभवायला मिळत आहे. येथील लहान मुलांनी 'वारली चित्रकला' जोपासली आहे. या चिमुकल्यांनी आपल्या अभ्यासाच्या खोलीतील भिंतीवर वारली चित्रकलेतून महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. या गावात कोणतेही महाविद्यालय किंवा शाळा नाही. खडकपाडा या आदिवासी पाड्यातील एका खोलीत ही मुले अभ्यास करतात. विविध सामाजिक संस्थांकडून येथील मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. 

एकीकडे आपल्या साधू-संतांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी'ची शिकवण दिली तर दुसरीकडे विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल केली जात आहे. या वृक्षतोडीदरम्यान ही सुखद बाब अनुभवायला मिळते. 

बातम्या आणखी आहेत...