आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅर्मअप सामना : लाेकेश राहुलच्या शतकाने टीम इंडिया विजयी, बांगलादेशवर ९५ धावांनी मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ - टीम इंडियासाठी चाैथ्या स्थानावरील फलंदाजी अधिक महत्त्वाची आहे.  त्यामुळे या ठिकाणी काेणत्या खेळाडूला आपल्याला सिद्ध करता येईल, यासाठीच भारतीय संघ चांगलाच अडचणीत हाेता. मात्र, आता लाेकेश राहुलच्या झंझावाती शतकाने भारतीय संघाची या स्थानावर फलंदाजी करण्याची माेठी चिंता आता दूर झाली. 


लाेकेश राहुल (१०८) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धाेनीच्या (११३) शानदार शतकी खेळीच्या बळावर भारताने दुसरा वाॅर्मअप सामना गाजवला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या माेबदल्यात बांगलादेशसमाेर विजयासाठी ३६० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलने (प्रत्येकी ३ बळी) बांगलादेशला अवघ्या २६४ धावांवर राेखले. यासह भारताने ९५ धावांनी सामना जिंकला. 

 

धाेनीचे दाेन वर्षानंतर शतक : 
धाेनीला या सामन्यातून आपला फाॅर्म गवसला आहे. त्याने  २०१७ नंतर पहिल्यांदा वनडे सामन्यात शतक साजरे केले.  धाेनीच्या या तुफानी शतकी खेळीने भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित केला.  रुबेल व शाकिबने  प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या.