दुसरी कसोटी / वॉर्नर दिवस-रात्र कसोटीत सर्वात मोठी खेळी करणारा पहिला खेळाडू

  • वॉर्नर 335* धावा; ऑस्ट्रेलिया (589) डाव घोषित
  • पाकिस्तानने 96 धावांवर 6 गडी गमावले, बाबर आझम 43 धावांवर नाबाद

प्रतिनिधी

Dec 01,2019 09:24:00 AM IST

​​​​​​अॅडिलेड : डेव्हिड वॉर्नरने (३३५*) करिअरमधील पहिले त्रिशतक झळकावले. तो दिवस-रात्र कसोटीत सर्वात मोठी खेळी करणारा पहिला खेळाडू बनला. यापूर्वी पाकिस्तानच्या अजहर अलीने २०१६ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध नाबाद ३०२ धावा काढल्या होत्या. दिवस-रात्र कसोटीत हे एकूण दुसरे त्रिशतक ठरले. आॅस्ट्रेलियाने पाक विरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ३ बाद ५८९ धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवस अखेर पाकिस्तानने ९६ धावांवर ६ गडी गमावले. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा बाबर आझम ४३ धावांवर खेळत आहे. मिचेल स्टार्कने ४ विकेट घेतल्या.


सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १ बाद ३०२ धावांच्या पुढे खेळणास सुरुवात केली. लबुचाने (१६२) दुहेरी शतकापासून वंचित राहिला. वॉर्नर व लबुचानेने दुसऱ्या गड्यासाठी ३६१ धावांची भागीदारी केली. स्टीव स्मिथने ३६ धावा केल्या.मॅथ्यू वेड ३८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा डाव गडगडला. सलामीवीर शान मसूद (१९), इमाम (२) अपयशी ठरले. कर्णधार अजहर अली (९), असद शफीक (९), इफ्तिखार अहमद (१०) आणि रिजवान (०) हे मोठी खेळाडू करू शकले नाही. बाबर सोबत यासिर शाह ४ धावांवर खेळत आहे.


वॉर्नर आॅस्ट्रेलियाकडून तिहेरी शतक करणारा सातवा खेळाडू


डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून तिहेरी शतक झळकावणारा सातवा खेळाडू. आतापर्यंत ८ संघातील एका तरी खेळाडूचे तिहेरी शतक आहे. भारताकडून सेहवागने २ व के. नायरने एकदा त्रिशतक ठोकले.


स्मिथच्या सर्वात कमी डावात ७ हजार धावा


स्मिथने ७० व्या सामन्यात १२६ डावात ७ हजार धावा पूर्ण केल्या. स्मिथच्या ७०१३ धावा झाल्या. तो सर्वात कमी डावात ७ हजार धावा करणारा खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या वाॅली हेमंडचा होता. हेमंडने १९४६ मध्ये १३१ डावात अशी कामगिरी केली होती.


पेनच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयावर टीका


वॉर्नर ४०० धावांपासून केवळ ६५ धावा दूर होता व तीन दिवसापेक्षा अधिक वेळ शिल्लक आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने डावाची घोषणा केली. अन्यथा वाॅर्नरने कसोटी इतिहासात सर्वात मोठी खेळीचा विक्रम रचला असता. पेनच्या निर्णयावर टीका होत आहे.


देश 300+ धावांचे खेळाडू

देश 300+ धावांचे खेळाडू
ऑस्ट्रेलिया 7
इंग्लंड 5
वेस्ट इंडीज 4
पाकिस्तान 4
श्रीलंका 3
भारत 2
द. आफ्रिका 1
न्यूझीलंड 1

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक नऊ तिहेरी शतके

विरुद्ध तिहेरी शतक
इंग्लंड 7
भारत 4
पाकिस्तान 4
न्यूझीलंड 3
द. आफ्रिका 3
वेस्ट इंडीज 3
श्रीलंका 2
ऑस्ट्रेलिया 1
बांगलादेश 1
झिम्बाब्वे 1

X
COMMENT