Home | International | Other Country | Warner Bros Taking Legal Action Over Trump Campaign

ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारासंबंधीचा व्हिडिओ टि्वट केला, ‘वॉर्नर ब्रदर्स’ने संगीत चोरल्याचा आरोप करत तो हटवला

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2019, 09:02 AM IST

व्हिडिओत द डार्क नाइट रायझेसच्या संगीताचा वापर

 • Warner Bros Taking Legal Action Over Trump Campaign

  वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराशी संबंधित एक व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला. वॉर्नर ब्रदर्सनी स्वामित्व हक्काचे (कॉपीराइट) प्रकरण असल्याचे सांगत तो टि्वटरवरून हटवला. हा व्हिडिओ ट्रम्प यांनी त्यांच्या अकाउंटवरून पोस्ट केला होता. ट्रम्प यांच्या व्हिडिओत वॉर्नर ब्रदर्सच्या २०१२ मधील द डार्क नाइट रायझेस या चित्रपटातील संगीताचा वापर केला होता.


  कंपनीचे प्रवक्त्याने सांगितले की, द डार्क नाइट रायझेसमधील संगीतासह पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ अनधिकृत होता. ट्रम्प यांच्या अकाउंटवरील हा व्हिडिओ पाहून वाॅर्नर ब्रदर्सच्या मालकाने तक्रार केली होती. त्यानंतर कॉपीराइटअंतर्गत हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला. या व्हिडिओत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह आणखी काही डेमोक्रॅट्सही दिसतात. हिलरी मागील अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी होत्या. व्हिडिओत लिहिले होते - ते आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, त्यानंतर तुम्हाला वर्णभेदी म्हणतील. ट्रम्प यांची सभांमधील आणि व्हाइट हाऊसमधील छबी दिसते. ट्रम्प यांच्या कारकीर्दीतील क्षण यात दाखवण्यात आले होते.


  उत्तर कोरियाचे नेते किम जोंगशी भेट, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ब्रेट कावानॉ यांची नियुक्ती आणि २०१६ च्या निवडणुकीतील रशियाच्या मध्यस्थीत विशेष वकील रॉबर्ट मूलर यांच्या तपासाचाही समावेश यात होता. आपल्या मतांनी सर्व चूक होते हे सिद्ध केले. २०२० च्या निवडणुकीत ट्रम्प प्रचंड मतांनी विजयी होतील, असा संदेश देत व्हिडिओ संपत होता.


  पाच तासांत व्हिडिओला १८.५ लाख व्ह्यूज
  ट्रम्प यांच्या या व्हिडिओला पाच तासात १८.५ लाख व्ह्यूज मिळाले. आपल्या व्हिडिओत इतरांच्या गीत-संगीताचा वापर करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांनी व्हर्जिनियातील एका सभेत रॉकस्टार एरोस्मिथ फ्रंटमॅन स्टीव्हन टेलरच्या लिव्हिंग ऑन एज या गीताचा वापर प्रचारात केला होता.

Trending