Warning / सावधान : डासांच्या चावण्यामुळे होऊ शकतात हे जीवघेणे आजार

दूषित आणि साचलेल्या पाण्यात मलेरियाच्या डासांची होते वाढ 
 

दिव्य मराठी

Aug 01,2019 03:40:00 PM IST

हेल्थ डेस्क - पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढत असते. मुले असो किंवा प्रोढ व्यक्ती प्रत्येक वयोगटातील लोकांना डासांमुळे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजाराशी लढावे लागते. अशात पावसाळ्याच्या दिवसांत डासांपासून बचाव करणे आवश्यक असते. जेणेकरून तुम्ही या जीवघेण्या आजारापासून बजाव करू शकाल.


जाणून घेऊयात डासांमुळे कोण-कोणते आजार होतात

> मलेरिया
एनाफिलिस या डास मादीच्या चावण्यामुळे मलेरिया रोगाची लागण होते. मलेरियाच्या डासांची दूषित आणि साचलेल्या पाण्यात वाढ होते. चक्करे येणे, श्वास घेण्यास अडचण होणे, ताप येणे इत्यादी मलेरियाचे लक्षणे आहेत. तुम्हाला असे एखादे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

> डेंग्यू
एडीज एजिप्टी या संक्रमित डास मादाच्या चावल्याने डेंग्यूची लागण होते. डेंग्यूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे ठीक होण्यासाठी अनेक दिवस लागतात. डेंग्यू होण्यापूर्वी रुग्णाला तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, मांसपेशी आणि सांधे दुखतात.

> चिकुनगुनिया
पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या साधारण आजारांपैकी चिकुनगुनिया देखील आहे. हा आजार चिकुनगुनिया व्हायरस घेऊन जाणाऱ्या डासांच्या चावण्यामुळे होतो. शरीराला कमजोर करणाऱ्या या आजारात रुग्णाला सांधेदुखीचा त्रास होतो. ही सांधे दुखी अनेक आठवड्यांपर्यंत राहते.

X