आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Warning To Parents As Driver Snaps Viral Photo Of Child In Leaves, Urges Drivers To Be Alert And Careful

रस्त्यावर ट्रक उभा करून सामानाची डिलिव्हरी करत होता ड्रायव्हर, तेवढ्यात पालापाचोळ्याच्या ढिगाऱ्यावर गेली त्याची नजर; जवळ जाऊन पाहीले तर त्याला बसला जोराचा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल्कहार्ट - अमेरिकेच्या इंडियानापोलिस राज्यात एका ड्रायव्हरच्या सावधानतेमुळे एका लहान मुलाचा जीव वाचला आहे. ड्रायव्हर सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी एका ठिकाणी गेला होता. दरम्यान, पार्सल देऊन बाहेर आल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पालापाचोळ्याच्या ढीगावर त्याची नजर पडली. त्यामध्ये त्याला विचित्र हालचाली होताना दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर तिथे त्याला एक लहान मुलगा झोपलेला दिसला. जो खेळता खेळता त्या ढीगामध्ये लपला होता. त्यानंतर ड्रायव्हर मुलाच्या आईला भेटला आमि त्याचा फोटो काढून घेतला. योगायोगाने ड्रायव्हर ज्या महिलेच्या घरी पार्सल देण्यासाठी गेला तीच त्या मुलाची आई होती.

 

ढिगाऱ्यात नाही दिसला मुलगा

> ही घटना अमेरिकेच्या एल्कहार्ट शहरात राहणाऱ्या ट्रक चालक जॉर्डन वीव्हर आणि लहान मुलाशी संबंधित आहे. ड्रायव्हरच्या सावधगिरीमुळे त्या मुलाचे आयुष्य वाचवले गेले. सोशल मीडियावर या घटनेचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पालापाचोळ्याचा ढीग आहे आणि त्यात लपलेले एक मूल दिसत आहे.
> जॉर्डनच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी तो शेजारच्या शहरात सामान वितरीत करण्यासाठी गेला होता. तो पार्सल देऊन बाहेर आल्यावर त्याची नजर रस्त्याच्या कडेला पानांच्या ढिगाऱ्याकडे गेली. तिथे एक मुलगा ढीगच्या मध्यभागी बसला होता. ते खूप धोकादायक होते कारण तो ढीग रस्त्याच्या खूपच जवळ होता. 

> वीव्हरने सांगितले की, पहिल्यांदा मला याबाबत खात्री नव्हती, मी जेव्हा त्या मुलाला ढिगाऱ्यात पाहिले तेव्हा मला चिंता वाटली होती. परंतु चांगली गोष्ट अशी होती की मी त्या ठिकाणापासून थोड्या दूर अंतरावर ट्रक उभा केला होता. म्हणून मी पार्सल देण्याआधी त्याला नाही पाहू शकलो आणि जेव्हा मी तेथून बाहेर पडलो तेव्हा माझी नजर त्याच्याकडे गेली. मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या आईला विचारल्यानंतर त्याचा एक फोटो घेतला. 

> वीव्हरचे म्हणणे आहे की, 'रस्त्यावर खेळणे मुलांसाठी सामान्य गोष्ट आहे, परंतु तो ढीग रस्त्याजवळ असता तर ते खूप धोकादायक झाले असते. मी हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. जेणेकरुन हे पहाल्यानंतर पालक आपल्या मुलांची विशेष काळजी घेऊ शकतील आणि ड्रायव्हर देखील वाहन चालवताना सावधगिरी बाळगतील. '

बातम्या आणखी आहेत...