आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ताल' ज्वालामुखी सक्रिय; तलावात त्सुनामीची शक्यता, 8000 जणांना सुरक्षितस्थळी हलवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ताल' ज्वालामुखी 40 वर्षानंतर परत सक्रीय, यातून निघालेला लाव्हा शहरभर पसरला
  • ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होऊ शकतो, मनीला एअरपोर्टवरुन जाणारे सर्व विमान रद्द
  • मनीलाच्या आकाशात धूर आणि राखेचे लोळ, ज्वालामुखीतील लाव्हा शहरभर पसरला
  • 1911 मध्ये झालेल्या उद्रेकात 1500 जणांचा मृत्यू झाला होता

मनीला- फिलीपाइन्समधील सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेला ‘ताल’ ज्वालामुखी सोमवारी सकाळी सक्रिय झाला. शास्त्रज्ञांनी सांगितल्यानुसार पुढील काही तासात ज्वालामुखीचा उद्रेक होईल. ताल तलावावर असलेला हा ज्वालामुखी सक्रिय झाल्यामुळे मनीलामधील हवामनात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यातून निघणारा लाव्हा 10-15 किलोमीटरपर्यंत पसरला आहे. धोका लक्षात घेता प्रशासनाने 8 हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. असा संशय व्यक्त करण्यात येतोय की, ज्वालामुखीचा लाव्हा ताल तलावात पडुन आसपासच्या परिसरात त्सुनामी येऊ शकते.

ताल जगातील सर्वात लहान ज्वालामुखींपैकी एक आहे. पण, हा फिलीपाइन्समधला दुसरा सर्वात मोठा सक्रीय ज्वालामुखी आहे. मागील 450 वर्षात 34 वेळेस हा ज्वालामुखी फुटला आहे. 1977 मध्ये शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता. 1974 मध्ये अनेक दिवस हा सक्रीय अवस्थेत आला होता. 1911 मध्ये झालेल्या उद्रेकात 1500 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली चिंता

रविवारी संध्याकाळपासून ज्वालामुखीतून धुर आणि राख निघणे सुरू झाले. यामुळे ताल परिसरात आतापर्यंत 75 भूकंपाचे झटके आले आहेत. यापैकी 32 झटके हे लेव्हल-2 म्हणजेच कमी तीव्रतेचे आहेत. यूनाइटेड नेशन्सच्या ह्यूमॅनिटेरियन अफेयर्सचे अधिकारी ओसीएचए फिलिपीन्स म्हणाले की, ज्वालामुखीच्या आसपास 14 किलोमीटरच्या परिसरात 4.5 लाख लोक राहतात. त्यांना लवकरात लवकर डेंजर झोनमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. फिलीपाइन्सच्या इंस्टीट्यूट ऑफ वोल्केनोलॉजी अँड सीस्मोलॉजी (फिवोल्क्स) ने अलर्ट लेव्हलला 3 वरुन 4 केले आहे, म्हणजेच हे धोका वाढल्याचे संकेत आहेत.