आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाच्या मृतदेहापासून खत बनवण्यासाठी मिळाली मंजुरी, या खताला बागेतील झाडांसाठी किंवा शेतीसाठी वापरू शकतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स- आमेरिकेत मानवाच्या मृतदेहापासून खत बनवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. वॉशिंग्टन याला लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. वॉशिंग्टनच्या गव्हर्नरने या बिलावर हस्ताक्षर केले आहेत. यामागे मृतदेह गाडल्यानंतर त्यामधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाला कमी करण्याचा आहे उद्देश आहे.


हा नवीन नियम पुढील वर्षी मे महिन्यापासून लागू होईल. यामध्ये लोकांकडे आपल्या शरीराला मेल्यानंर खत बनवण्यासाठी देण्याचा पर्याय असेल. या प्रक्रियेला रिकम्पोजिशन म्हटले जाते. 


सिएटलच्या एका कंपनीने दिली होती ऑफर
सिएटलची कंपनी रीकम्पोजने सगळ्यात आधी मानवी खत बनवण्याची ऑफर दिली होती. हे नियम लागू करण्यासाठी कायद्याची लढाई लढणारी रीकम्पोजची संस्थापक कॅटरीना स्पेडचे म्हणने आहे की, "रीकम्पोजिशन मृतदेहाला पुरण्याचा किंवा जाळण्याचा पर्याच देते. ही नैसर्गिक असण्यासोबतच सुरक्षित आणि टीकाऊ पद्धत आहे. यामुळे फक्त कार्बन उत्सर्जनच थांबणार नाही तर जमिनीची बचतही होईल. 


10 वर्षांपूर्वी आला होता विचार
कैटरीनाने सांगितले की, "रीकम्पोजिशनचा विचार 10 वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी मी 30 वर्षांची होते आणि स्वतःच्या मृत्यूबद्दल जास्त विचार करू लागले. त्यानंतर मी पर्यावरणपुरक पर्यायाबद्दल विचार करणे सुरू केले. साठी माझा सामना 20 बिलियन डॉलर (अंदाजे 1.3 लाख कोटी रूपये) असलेल्या अमेरिकेतील अंतिम संस्कार व्यापाराशी होता, जो पारंपारीक चालीरितींना मानतो."


मानवी खताची ट्रायलदेखील झाली
मानवी खतासाठी कॅटरीनाने वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये याची ट्रायलदेखील केली. यासाठी मृदेहाला स्टीलच्या कंटेनरमध्ये वाळलेल्या गवतासोबत, लाकंड आणि स्ट्रॉसोबत 30 दिवसांसाठी बंद केले. या दरम्यान बॅक्टीरियाने मृदेहाला पूर्णपणे डिकम्पोज केले होते. या प्रक्रियेतून मिळालेले उत्पादन पुर्णपणे वाळलेले आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असे होते,ज्याचा वापर बागेतील झाडांसाठी केला जाऊ शकतो.

 

कॅटरीनाने सांगितले की, "प्रक्रियेत हडे आणि दातदेखील पूर्णपणे नष्ट झाली. बॅक्टीरिया (मायक्रोब्स) मतदेहाला पूर्णपणे डिकम्पोज करावे यासाठी आम्ही तापमान जास्त ठेवले." रीकम्पोज प्रक्रियेत आधी प्रण्यांच्या मृतदेहामधून खतं बनवले जायचे. वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीला कळाले की, ही प्रक्रिया मानवी मृतदेहासाठीही उपयोगी ठरेल.

बातम्या आणखी आहेत...