आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनचेस्टरच्या विमानतळावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमसोबत गैरवर्तन, म्हणाले- 'खूप अपमानित वाटत आहे...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने मॅनचेस्टर एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्नाचा आरोप लावला आहे. अक्रम यांनी सांगितले की, मंगळवारी एअरपोर्टवर त्यांना आपल्या औषधांना कचऱ्याच्या डब्यात फेकावे लागले. त्यांनी याची माहिती सोशल मीडियावरुन दिली. अक्रम 1997 पासून टाइप-1 डायबिटीजचा उपचार करत आहेत, तेव्हा ते पाकिस्तानचे कर्णधार होते. अक्रम यांना दिवसातून अनेकवेला इंसुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते

 

 

अक्रम यांनी ट्वीट किया, "मॅनचेस्टर एअरपोर्टवर आज माझे मन मोडले. जगभरात मी माझ्या इंसुलिनसोबत प्रवास करतो, पण एअरपोर्टवर मला खूप वाईट वाटले. मला खूप अपमानित वाटत आहे. माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आणि माझ्या इंसुलिनला कोल्ड केसमधून काढून प्लास्टीच्या पिशवीत टाकावे लागले."


‘एअरपोर्ट प्रशासनाने औषधांची काळजी घेतली नाही’
53 वर्षीय अक्रम काही दिवसांपूर्वी इंग्लंड अँड वेल्समध्ये झालेल्या विश्वचषकात कॉमेंट्री करत होते. अक्रम म्हणाले, "एअरपोर्ट प्रशासनाने त्यांच्या डायबीटीज औषधांची नीट काळजी घेतली नाही." 

बातम्या आणखी आहेत...