आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर/पुणे - यजमान विदर्भ संघाच्या अनुभवी फलंदाज वसीम जफर (५७) आणि गणेश सतीशने (५८) मंगळवारी आपल्या घरच्या मैदानावरील रणजी ट्राॅफीमध्ये केरळविरुद्ध दमदार खेळी केली. विदर्भाने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात पाच गड्यांच्या माेदबदल्यात २३९ धावा काढल्या. या अर्धशतकासह वसीमने रणजी ट्राॅफीमध्ये १२ हजार धावा पुर्ण केल्या. असे करणारा ताे पहिलाच फलंदाज ठरला. आता टीमचा आदित्य सरवटे (२२) आणि अक्षय कर्नेवार (२४) मैदानावर खेळत आहेत. टीमचा कर्णधार फैज फझल (१०) स्वस्तात बाद झाला. तसेच चाैधरी भाेपळा न फाेडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
दुसरीकडे यजमान महाराष्ट्राच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर आेडिशा संघाची चांगलीच दमछाक केली. यामुळे आेडिशाच्या संघाला दिवसअखेर ५ बाद २२० धावा काढता आल्या. संघाकडून सलामीवीर शंतनू मिश्राने (८४) एकाकी झुंज देताना अर्धशतकी खेळी केली. याशिवाय त्याने सारंगीसाेबत (४१) दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, ही जाेडी बाद झाल्यानंतर टीमच्या तीन फलंदाजांना एकेरी धाव संख्येने पॅव्हेलियन गाठावे लागले. यात कर्णधार सेनापतीचा (१) समावेश आहे. तसेच पाेद्दार (५) व संमर्थीने (५) पॅव्हेलियन गाठले. महाराष्ट्राकडून अक्षय पालकरने दाेन विकेट घेतल्या. मनाेज व सत्यजीतने प्रत्येकी एक विकेट घेतली.
सरफराज, मुलानीचा झंझावात :
मुंबई संघाच्या गत सामन्यात द्विशतकवीर सरफराज खान (७८) आणि शॅम्स मुलानी (५९) यांनी राजकाेटच्या मैदानावर साैराष्ट्रविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेेळी केली. याच्या बळावर मुंबई संघाने पहिल्या डावात दिवसअखेर ८ बाद २४९ धावा काढल्या. आता संघाचा मुलानी मैदानावर कायम आहे. यजमान संघाकडून धर्मेद्र सिंग जडेजाने (५/९०) धारदार गाेलंदाजी केली. तसेच मंकडने दाेन आणि मकावानाने एक बळी घेतला.
वसीमच्या अर्धशतकाने टीमची दमदार सुरुवात
विदर्भ संघाचा अनुभवी फलंदाज वसीम जफरने रणजी ट्राॅफीमध्ये विक्रमी धावांचा पल्ला गाठला. त्याने रणजी ट्राॅफीमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या. अशा प्रकारे या स्पर्धेत धावांचा हा माेठा आकडा गाठणारा वसीम हा पहिला फलंदाज ठरला. त्याने केरळविरुद्ध सामन्यात ५७ धावांची खेळी केली. यासह त्याला १२ हजार धावा पूर्ण करता आल्या. रणजी ट्राॅफीमध्ये सर्वाधिक ४० शतकांचा विक्रम ४१ वर्षीय वसीमच्या नावे नाेंद आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.