• Wasim Jaffer, the first player to play the 150th Ranji match

रणजी ट्रॉफी / वसीम जाफर १५० वा रणजी सामना खेळणारा पहिला खेळाडू

  • रणजी ट्रॉफी:  आंध्राचा धुव्वा, विहारीचे अर्धशतक

वृत्तसंस्था

Dec 10,2019 08:55:00 AM IST

विजयवाडा- दाेन वेळचा किताब विजेत्या विदर्भ संघाचा अनुभवी फलंदाज वसीम जाफर रणजीच्या करिअरमधील दीडशतकी सामना खेळण्यासाठी साेमवारी मैदानावर उतरला. अशा प्रकारे सर्वाधिक १५० वा रणजी सामना खेळणारा वसीम हा देशातील पहिला क्रिकेटपटू ठरला. या ४१ वर्षीय क्रिकेटपटूच्या नावे या स्पर्धेत सर्वाधिक ११ हजार ७७५ धावांची नाेंद अाहे. सत्रात त्याला यामध्ये २० हजार धावा पूर्ण करण्यासाठी संधी अाहे.


विदर्भाने प्रथम फलंदाजी करणारा आंध्र प्रदेशचा २११ धावांवर धुव्वा उडवला. आंध्र प्रदेश संघाकडून कर्णधार हनुमा विहारीने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. विदर्भाच्या अादित्य सरवटे आंध्र प्रदेशचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर विदर्भाने दिवसअखेर िबनबाद २६ धावा काढल्या.

X
COMMENT