Home | Business | Gadget | Watch 2 TV From One Set Top Box At Home; here is Full Trick

Watch 2 TV From One Set Top Box: एकाच DTH च्या मदतीने पाहा दोन टिव्हींवर वेगवेगळे चॅनल, जाणून घ्या ट्रिक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 01:59 PM IST

दोन सेटटॉप बॉक्सला अशापद्धतीने करा कनेक्ट; सोपी आहे पुर्ण प्रोसेस

 • Watch 2 TV From One Set Top Box At Home; here is Full Trick

  गॅजेट डेस्क- तुमच्या घरात दोन टिव्ही आहे आणि दोन्हींना वेगवेगळ्या डिश बसवलेल्या आहेत तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुम्ही एकाच डिशवर दोन टिव्हीवर वेगवेगळे चॅनल पाहू शकतात. त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे भरण्याची आवश्यकता नसून एका छोट्याशा ट्रिकची गरज आहे. टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) DTH आणि केबल ऑपरेटर्ससाठी 1 फेब्रुवारीपासून नविन नियम लागू करणार आहे. त्यामुळे 1 तारखेपासून युझर्सला निवडलेल्या चॅनलचेच पैसे भरावे लागणार आहे.

  ही आहे ट्रिक
  > एका 'DTH'च्या मदतीने दोन टिव्हींवर वेगवेगळे चॅनल पाहण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा सेटटॉप बॉक्सची आवश्यकता आहे.
  > परंतू सेटटॉप बॉक्स घेताना सेटटॉप बॉक्सला LNB OUT पोर्ट आहे का याची खात्री करुन घ्या.
  > जोडणी करताना एका सेटटॉप बॉक्समध्ये MPEG-4 आणि दुसऱ्यात MPEG-2 अशी जोडणी करा. MPEG-2 सेटटॉप बॉक्समध्ये LNB इन आणि LNB आउट असे दोन पोर्ट असतात.
  > त्यानंतर 'DTH'ची मेन केबल सेटटॉप बॉक्सच्या इन पोर्टमध्ये लावा. तर LNB आउट पोर्टमधून दुसऱ्या केबलचे कनेक्शन MPEG-4 च्या LNB इनमध्ये जोडा.
  > अशाप्रकारे तुम्ही MPEG-4 बॉक्स दुसऱ्या रुममध्ये ठेवून दुसऱ्या टिव्हीवर तुमच्या पसंतीचे चॅनल पाहू शकतात.

  पुढील स्लाइडवर पाहा- काय आहे 'TRAI'चा नविन नियम

 • Watch 2 TV From One Set Top Box At Home; here is Full Trick

  'TRAI'चा नविन नियम
  > 'TRAI'च्या नविन नियमांनुसार तुम्हाला निवडलेल्या चॅनलचेच पैसे भरावे लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला विनाकारण जास्तीचे पैसे भरण्याची गरज नाही.

   

  पुढील स्लाइडवर पाहा- 'TRAI'ने दिली ही माहिती 

   

 • Watch 2 TV From One Set Top Box At Home; here is Full Trick

  'TRAI'ने दिली ही माहिती
  > 'TRAI'च्या प्रेसनोटनुसार, गुरुवारी प्रसारक, DTH ऑपरेटर आणि एमएसओ (मल्टी सिस्टिम ऑपरेटर)यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत सर्वांनी नविन नियमांना लागू करण्यावर संमती दर्शवली. तसेच ग्राहकांना यावर विचार करण्यासाठी 1 फ्रेब्रुवारीपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे इथून पुढे ग्राहकाला आपल्या पसंतीचे चॅनल निवडत येणार असून चॅनलप्रमाणे पैसे भरावे लागणार आहे.

Trending