आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरच्या सर्वात चॅलेंजिग भूमिकेसाठी असा तयार व्हायचा अक्षय कुमार, म्हणाला - मेकअपसाठी लीड हिरोइनपेक्षा जास्त वेळ लागत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अक्षय कुमारने ट्विटरवर आगामी चित्रपट '2.0' मधील त्याच्या लूकचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. 54 सेकंदांचा हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने लिहिले की," '2.0' साठी माझी भूमिका कोणत्याही टेक्नॉलॉजिकल चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मी या भूमिकेत कसा जात होतो? जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहा." अक्षय कुमार या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. या लूकमध्ये येण्यासाठी त्याला तासंतास बसून प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत होता.


मेकअपसाठी किती वेळ लागायचा याविषयी स्वतः अक्षयने सांगितले 
- '2.0' च्या ट्रेलर लाँच दरम्यान अक्षय कुमार म्हणाला होता, "माझ्या मेकअपसाठी साडेतीन तास लागत होता. मेकअप काढण्यासाठी दिड तास लागत होता. मी माझ्या 28 वर्षांच्या करिअरमध्ये एवढा मेकअप कधीच केला नाही." अक्षय यावेळी म्हणाला की, क्रो-मॅनची भूमिका आयुष्यातील सर्वात चॅलेंजिंक भूमिका होती. चित्रपटाच्या डायरेक्टरला तो साइंटिस्ट म्हणाला. 
- यासोबतच अक्षयने एका ट्विट करुन या भूमिकेसाठी लागणा-या वेळेविषयी सांगितले होते. तो म्हणाला होता की, "एक अॅक्टर, ज्याने यापुर्वी एवढा मेकअप कधीच केला नाही, '2.0' ही एक वेगळीच कहानी आहे. मला वाटते की, या लूकमध्ये येण्यासाठी मला चित्रपटाच्या लीड अॅक्ट्रेसपेक्षाही जास्त वेळ लागत होता."

 

2011 मध्ये पहिल्यांदा आले होते सीक्वलचे वृत्त 
- चित्रपटाचा पहिला पार्ट 'रोबोट'(एंथिरण)2010 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर रत्न्वेलुने खुलासा केला होता की, चित्रपटाच्या सीक्वलवर टेक्नीकल टीमसोबतच प्री-प्रोडक्शन काम सुरु झाले आहे. पण 2015 मध्ये चित्रपटाला फायनेंसर मिळाला. लीका प्रोडक्शनने हे प्रोड्यूस करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अक्षय कुमार रजनीकांतसोबत काम करणार अशा चर्चा 2015 मध्ये सुरु झाल्या. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...