आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Watch Video Of Operation On A Chubby Swallowed Lollipop Tube In Baby Girl In Pune

Shocking Video: लॉलीपॉप खात होती चिमुकली, आई गुंतली आपल्या कामात, जेव्हा वेदनेने व्हिवळली तेव्हा रूग्णालयात घेऊन गेले, एक्स-रे पाहून सगळ्यांना धक्का बसला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हिडीओ डेस्क- तुमच्या घरी लहान मुले आहेत आणि त्यांना लॉलीपॉप खाण्याची आवड आहे, तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. पुण्यात एका बेजबाबदार आईने आपल्या लहान चिमुकलीला लॉलीपॉप खाण्यासाठी दिले आणि आपल्या कामात व्यस्त झाली. चिमुकलीने लॉलीपॉप खाता-खाता त्याची प्लास्टीकची कांडी गिळून टाकली. त्यानंतर तिला असह्य वेदना सुरू झाल्या, आणि तिने रडणे सुरू केले. त्यानंतर आईला आपली चुक लक्षात आली, आणि ती त्या कांडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. अनेक प्रयत्न करूनही ती कांडी बाहेर आली नाही आणि मुलीच्याही वेदना वाढल्यामुळे तिला रूग्णालयात भर्ती करावे लागेल. तिथे डॉक्टरांनी त्या मुलीचा एक्स-रे काढला, त्यात त्यांना दिसले की, प्लास्टीकची कांडी मुलीच्या पोटात अडकली आहे. लवकर उपचार केले नसते तर त्या मुलीच्या जीवीताला धोका होता, त्यामुळे तत्काळ डॉक्टरांनी एंडोस्कोपीच्या मदतीने चिमुकलीच्या पोटात अडकलेली लॉलीपॉपची कांडी बाहेर काढली आणि मुलीचा जीव वाचवला.

 

हा व्हीडीओ म्हणजे लहान मुलांच्या पालकांसाठी एक शिकवण आहे. त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे, ते काय खात आहेत, त्याने त्यांच्या आरोग्याला काही धोका तर नाहीये ना, हे प्रत्येक लहान मुलांच्या पालकांचे कर्तव्य आहे.

बातम्या आणखी आहेत...