बॉलिवूड / कमाल आर खानचा व्हिडिओ 'तुम मेरी हो' पाहून यूजर्सने विचारले - 'भाईसाहब किस लाइन में आ गए?'

केआरकेच्या गाण्यावरील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांचीदेखील उडवली खिल्ली

Sep 17,2019 02:20:25 PM IST

बॉलिवूड डेस्क : अनेकदा सेलेब्सला आपल्या कमेंट्सने निशाणा बनवणाऱ्या कमाल आर खानचे एक व्हिडिओ सॉन्ग 'तुम मेरी हो' ला बॉलिवूड सेलेब्सकडून कौतुक मिळत आहे. अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, टायगर श्रॉफनंतर अनिल कपूरनेदेखील केआरकेचा व्हिडिओ शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या. पण सोशल मीडिया यूजर्सने त्याला खूप ट्रोल केले आहे. अनेकांनी तर हेदेखील लिहिले आहे की, 'भाईसाहब ये किस लाइन में आ गए आप ?'


कमाल राशिद खानचे व्हिडिओ सॉन्ग 'तुम मेरी हो' चे लिरिक्सदेखील केआरकेनेच लिहिले आहेत, तर या गाण्याला आवाज जावेद अलीने दिला आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन नीतिश चंद्राने केले आहे.


सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियांचीदेखील उडवली खिल्ली...
कावळ्याशी केली तुलना...

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा केआरकेच्या व्हिडिओ सॉन्गची लिंक ट्विटरवर शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या. तेव्हा यूजर्सने केआरकेची तुलना कावळ्यासोबत केली.


गाणे प्ले करून तरी पाहायचे होते...
ऋतिक राेशनने जेव्हा केआरकेचाक गाण्याचे कौतुक केले तेव्हा एका यूजरने दोघांवरही निशाणा साधला. ऋतिकने लिहिले, 'मी याच्या निरागसतेवर स्मितहास्य करणे बंद करू शकत नाही. शुभेच्छा.' द स्किन डॉक्टर नावाच्या एका यूजरने लिहिले, 'यार तुम्ही आणि सीनियर बच्चन यांसारख्या बिलेयनेयर्सवर असे कोणते संकट आले आहे, ज्यामुळे तुम्हाला केआरकेसारख्या लोकांसाठी प्रमोशनल ट्वीट करावे लागत आहे. माझे म्हणणे हे आहे की, गाणे वाजवून तरी पाहायचे होते.'


नाईलाज असतो तेव्हा काय काय करावे लागते...
पंजाबी सिंगर आणि लिरिसिस्ट गुरु रंधावा यानेदेखील केआरकेचे गाणे शेअर करत करते त्याला शुभेच्छा दिल्या, पण गुरुच्या फॅन्सने त्यालाही सोडले नाही. एका यूजरने लिहिले, 'पाजी नाईलाज असताना कायकाय करावे लागते.'

X