Home | National | Madhya Pradesh | watchman, pregnant wife beaten for car scratch injuries found on fetus dead body

Shocking: संतप्त मालकाकडून चौकीदाराच्या गर्भवती पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पोटातच झाला बाळाचा मृत्यू, अर्भकाच्या डोक्यावर सापडल्या जखमा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 01:02 PM IST

महिला अर्भकाचा मृतदेह पोलिस स्टेशनपर्यंत पुरावा म्हणून घेऊन गेली. त्याच्या डोक्यावर सुद्धा मारहाणीच्या जखमा आहेत.

 • watchman, pregnant wife beaten for car scratch injuries found on fetus dead body

  इंदूर - मालकाच्या गाडीला स्क्रॅच काय लागला त्याने चौकीदाराला घरात घुसून अमानुष मारहाण सुरू केली. घटनास्थळी चौकीदाराची 9 महिन्यांची गर्भवती पत्नी होती. परंतु, पैश्यांच्या मोहात आंधळा झालेल्या मालकाला तिच्यावर सुद्धा दया आली नाही. त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या गरोदर महिलेच्या पोटात लाथा मारल्या. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु, डॉक्टरांनी तिच्या बाळाला मृत घोषित केले. पीडित महिला अर्भकाचा मृतदेह पोलिस स्टेशनपर्यंत पुरावा म्हणून घेऊन गेली. त्याच्या डोक्यावर सुद्धा मारहाणीच्या जखमा आहेत.


  काय आहे प्रकरण?
  > पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती गेल्या 5 वर्षांपासून एका इमारतीमध्ये चौकीदाराची नोकरी करत होता. येथील एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुकेश वाधवानीच्या कारवर किर्कोळ स्क्रॅच पडल्या होत्या. त्याच रात्री मालक मुकेशने 10 वाजता तिच्या पतीला फ्लॅटवर लाइट बंद असल्याच्या बहाण्याने बोलावले. परंतु, फ्लॅटमध्ये लाइट बंद नव्हती. तो ही गोष्ट मालकाला विचारण्यासाठी गेला तेव्हा त्याने कारला लागलेल्या स्क्रॅचचे विचारून भांडण्यास सुरुवात केली. यानंतर बाजूच्या फ्लॅटमधून लोक बाहेर आले आणि चौकीदाराला वाचवून प्रकरण शांत केले. परंतु, त्याच दिवशी रात्री 2 वाजेच्या सुमारास मालक मुकेश, दीपक आपले भाऊ अक्कू आणि बंटीला घेऊन चौकीदाराच्या घरात घुसले आणि त्याला बेडवरच मारहाण सुरू केली.
  > चौकीदाराला मारहाण होत असताना त्याची 9 महिन्यांची गर्भवती पत्नी तेथेच होती. तिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी तिला दूर फेकले. पुन्हा अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा लाथा-बुक्यांनी तिला मारहाण केली. यानंतर ती गर्भवती असल्याचे पाहून तिच्या पोटावर सुद्धा लाथा मारल्या. झटापटीत तिला आपल्या पतीचीही लाथ लागली. दोघे घराबाहेर पळून निघाले तेव्हा आरोपींनी त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. त्यापैकी एकाने रस्त्यावरचे रोपटे उचलले आणि त्याने डोक्यावर मारहाण केली. दुसऱ्याने सायकल उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा उच्च रक्तदाबामुळे महिला बेशुद्ध पडली.


  आरोपींना अटक
  रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी व्यापारी मुकेश आणि दीपक या दोघांना अटक केली. त्यांच्या विरोधात मारहाण आणि हाफ मर्डरचा खटला दाखल करण्यात आला आहे. सोबतच, पोलिसांनी एससी/एसटी अॅक्ट अंतर्गतही दोघांवर गुन्हा दाखल केला.

Trending