आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांची अब्रूही धोक्यात: चौकीदाराने केले मुलाचे अपहरण; अनैसर्गिक कृत्य करताना ओरडला तेव्हा गळ्यावरच केले वार, मरण्यासाठी सोडून पसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - देशभर लहान मुली आणि महिलांविरोधी अत्याचाराच्या घटना वाढत असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गल्लीत खेळत असलेल्या एका 14 वर्षांच्या मुलावर चौकीदाराने वाइट नजर टाकली. त्याचे अपहरण करून अनैसर्गिक अत्याचार सुरू केला. यास विरोध करताना जेव्हा त्या मुलाने ओरडून मदत मागितली, तेव्हा चिडलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. तसेच मेल्याचे समजून त्याचे हातपाय बांधून पेटीत लपविले. तब्बल 4 तास तो अशाच जखमी अवस्थेत पडला होता. गावातील काही युवकांनी त्याची सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. 


वडिलांचा मृत्यू, आई घर सोडून गेली...
- गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल असलेल्या पीडित मुलाची काळजी घेण्यासाठी या जगात कुणीच नाही. 10 वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. तर आईने काही वर्षांपूर्वीच त्या मुलाला वाऱ्यावर सोडले. तो सध्या आपल्या आजीच्या घरी राहत आहे. आठवीला असलेल्या या मुलाने रडत-रडत आपली आपबिती पोलिसांना सांगितली. 
- पीडित मुलाने सांगितल्याप्रमाणे, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास तो गल्लीत खेळत होता. त्याचवेळी सुखविंदर सिंग नावाचा एक चौकीदाराने त्याला बळजबरी उचलून घरी नेले. त्या ठिकाणी मुलाचे कपडे काढून अश्लील चाळे सुरू केले. बळजबरी संबंध बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलाने ओरडून मदत मागितली. यावर चिडलेल्या आरोपीने घरातील कोयत्याने मुलाच्या गळ्यावर वार केले. 


आरोपीच्या मुलानेच वाचवला जीव
पीडित मुलाची सुटका करून त्याचा जीव वाचवणाऱ्या युवकांपैकी एकाने घटनाक्रम सांगितला. गावातील युवक गल्लीत आपल्या मित्रमंडळींसोबत गप्पा मारताना थांबले होते. त्याचवेळी चौकीदार सुखविंदरचा मुलगा धावत आला. आपले वडील दारुच्या नशेत एका मुलावर अत्याचार करत आहेत असे त्याने युवकांना सांगितले. थोडासाही विलंब न करता युवकांनी थेट चौकीदाराच्या घरात धाव घेतली. तेव्हा घरातील पेटीखाली गंभीर जखमी आणि रक्तरंजित अवस्थेत मुलगा सापडला. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले होते. चौकीदाराच्या मुलाने युवकांना सांगण्यात उशीर केला असता तर पीडित मुलाचा जीव वाचलाच नसता.

बातम्या आणखी आहेत...