आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात मोदी सरकारच्या विरोधात घोषणा; विद्यार्थिनीस अटक व दुसऱ्या दिवशी सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तूतीकोरिन- तामिळनाडूमध्ये भाजप आणि मोदी सरकारविरोधात विमानात घोषणा दिल्याने लुईस सोफिया (२८)या तरुणीस पोलिसांनी अटक केली. सोफियाने भाजप प्रदेशाध्यक्ष सुंदरराजनसमोर विमानात "फॅसिस्ट बीजेपी डाऊन डाऊन'अशा घोषणा दिल्या होत्या. 


सुंदरराजन यांच्या तक्रारीवरून पुदुकोट्टई पोलिसांनी एफआयआर दाखल करून सोफियाला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची पोलिस कोठडीत रवानगी केली. तेथे तिची प्रकृती बिघडल्याने सोमवारी रात्री तुतीकोरिन वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅनडातील एका विद्यापीठात गणितावर संशोधन करणाऱ्या सोफियाला त्याच न्यायालयाने मंगळवारी बिनशर्त जामीन मंजूर केला. सोफियाचे वडील सुंदरराजन आणि त्यांच्या समर्थकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले, आम्ही या तक्रारीची चौकशी करत आहोत. सोफिया चेन्नईहून तुतीकोरिनला जात होती. विमानात भाजप प्रदेशाध्यक्षाही होत्या. 

 

माफी मागणार नाही : सुंदरराजन 
तामिळनाडूच्या भाजप प्रदेशाध्यक्ष तमिळसाई सुंदरराजन म्हणाल्या, या घटनेबद्दल आपण माफी मागणार नाही. तिचा दहशतवादी गटाशी संबंध असू शकतो. या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. विमानतळ प्रतीक्षालयात तिने अर्वाच्य भाषा वापरली होती. 

बातम्या आणखी आहेत...