आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेलंगणातील शाळकरी मुलांच्या आराेग्यासाठी सिकंदराबादेत ‘वाॅटर बेल’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सिकंदराबाद - शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना त्यांच्या गणवेशापासून डब्यापर्यंतची सारखी चिंता सतावते. परंतु तेलंगण सरकारने मुलांबद्दलची पालकांची आराेग्यविषयक चिंता चुटकीसरशी साेडवली आहे.  त्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत वाॅटर बेल नावाचा कार्यक्रम राबवला आहे. मुला-मुलींनी शाळेत असताना दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, असा त्यामागील उद्देश आहे. सरकारी शाळांतून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. देशात इतर राज्यांतही हा उपक्रम निश्चितपणे अनुकरणीय ठरावा.