आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात २२५० रेल्वेस्थानकांवर बसवणार पाण्याची बाटली क्रश करणारे यंत्र; प्लास्टिकपासून तयार होणार टी शर्ट आणि कॅप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे स्थानकांवर फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आता टी शर्ट व कॅप तयार करण्यात येणार आहे. याचा पहिला यशस्वी प्रयोग बिहारमधील पाटणा रेल्वेस्थानकावर करण्यात आला आहे. आता देशातील २२५० स्थानकांवर मशीन बसवण्याची तयारी आहे. या बाटल्यावर पुन: प्रक्रिया होणार आहे. रेल्वे विभागाच्या एडीजी स्मिता वत्स यांनी सांगितले, रेल्वेत दररोज १६ लाख पाण्याच्या बाटल्याचा वापर होतो. या प्रयोगानंतर प्रति स्थानकावर ३०० बाटल्यांचा चुरा करण्यात येईल. या हिशेबाने दररोज ७ लाख बाटल्या नष्ट होतील. यापासून सुमारे ५८ हजार टी शर्ट तयार होतील. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेशकुमार म्हणाले, दानापूर येथे बाटल्यांचा चुरा झाल्यानंतर पाटणा,  राजेंद्रनगर व दानापूरमध्ये या बाटल्यांसाठी क्रश मशिन लावली आहे. पाटणा स्थानकात रोज ३०० बाटल्या  क्रश मशीनमध्ये टाकण्यात येतात. या बाटल्या मशिनमध्ये टाकल्यानंतर प्रति बॉटल ५ रु. मिळतात.

 

१२ बाटल्या क्रश करून तयार होतो टी शर्ट 
बाटल्या क्रश करून टी शर्ट तयार करणारी स्टार्टअप कंपनी बायोक्रशचे सीईओ अजय मिश्रा यांनी सांगितले, यापासून तयार केलेले टीशर्ट मजबूत व टिकाऊ असतात. एक टी र्शट तयार करण्यास सुमारे १२ बाटल्या लागतात.
 

बातम्या आणखी आहेत...