आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - जालना पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांनी दरराेज एक तास श्रमदान करून २०८ एकर परिसरात जलसंधारणाची कामे केली आहेत. यातून जवळपास १ कोटी लिटर पाणी अडवण्यात यश आले अाहे. जलसंधारणाच्या या कामांमुळे या केंद्रातील पाण्याचे दुर्भिक्ष दूर होण्यास मोठी मदत झाली आहे.
दररोज श्रमदान
प्रशिक्षण केंद्रात ११६० प्रशिक्षणार्थी पोलिस आहेत. त्याच्या रोजच्या एका तासाच्या श्रमदानातून २०८ एकरातत पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी चर खोदले.
ही कामे केली
प्राचार्य चव्हाण यांनी अभ्यास करून सलग समतल चर, माती नाला बंधारे, नाला खोलीकरण ही कामे केली. शिवाय १६ नाले अडवून पाणी थांबवण्यात आले.
आपत्तीतून धडा :
गतवर्षी उन्हाळ्यात या पोलिस प्रशिक्षण केंद्राला पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दररोज आठ टँकरने पाणी मागवावे लागत होते. केवळ टंचाईच्या कारणातून आपत्तीतून धडा घेत प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी येथे जलसंधारणाची कामे सुुरु केली.
असा झाला फायदा
प्रशिक्षणार्थी पोलिसांनी चार मोठे तलाव खोदले. या सर्व तलावांत पाणी आले आहे. शिवाय चारही विहिरींना भरपूर पाणी आले आहे.
आता इतरत्र प्रयोग
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व एसपी एस.चैतन्य यांनीही कामाची पाहणी केली. हे मॉडेल अन्यत्र राबवण्याचा संकल्प त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.