आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईमध्ये पाण्याचे भीषण संकट, ४६ लाख लोकांचे हाल; शाळांना सुटी, शहरात टोकणने टँकर पाणी वाटप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तामिळनाडूची राजधानी चेन्नईत पाण्याचे संकट गहिरे होत चालले आहे. लोकांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्यामागे काही मोठी कारणे आहेत. पहिले- चेन्नईला चार जलाशयाद्वारे पाणीपुरवठा होतो. ही चारही जलाशये कोरडेठाक पडण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या जलाशयांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी एकूण क्षमतेच्या केवळ ०.२ टक्के एवढे आहे. त्यामुळे जलवाहिन्यांद्वारे शहरात होणारा पुरवठा ४० टक्क्यांनी कमी करण्यात आला. दुसरे कारण- शेजारी राज्य कर्नाटकसोबत सुरू असलेला कावेरी तंटा होय. गरजेपुरतेदेखील पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. पाण्याच्या संकटामुळे चेन्नईतील सुमारे ४६ लाख लोकांना पिण्याचे पाणीदेखील मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळेच येथे पालिकेने टोकण प्रणाली लागू केली आहे. 
 

> मद्रास हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवून जबाब मागितला
> पाण्याच्या संकटामुळे हॉटेल-रेस्तराँ बंद, अनेक हॉटेलांच्या दारांवर पाण्याचा तुटवड्याची नोटीस लावली
> चेन्नई मेट्रोचे एसी बंद, आयटी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना 
> खासगी टँकरनी पाण्याचे दर तिपटीने वाढवले, एक आठवडा पाण्यासाठी प्रतीक्षा 
 

१९६ दिवसांनंतर आशा 
> दुष्काळ व उष्णतेचा झळा बसत असतानाच गुरुवारी चेन्नईत वेलाचेरीसह पाच उपनगरांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे १९६ दिवसांनंतर कोसळलेल्या पाऊसधारांनी नागरिकांच्या पाण्याचा आशा पल्लवित केल्या. 
> आगामी चार दिवसांत चेन्नईत ठिकठिकाणी रिमझिम पाऊस होण्याची शक्यता आहे. चेन्नई पूर्वोत्तर मान्सूनवर अवलंबून आहे. तो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. 
> यंदा २० दिवस विलंबाने तो दाखल झाला.