Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | water drinking tips in marathi

जाणून घ्या, शरीरात कुठे होतो पाण्याचा उपयोग, जास्त पाणी पिणेही नुकसानकारक

हेल्थ डेस्क | Update - Aug 10, 2018, 12:05 AM IST

प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यायला हवे? हा प्रश्न सोपा आहे, पण उत्तर अवघड आहे.

  • water drinking tips in marathi

    प्रौढ व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यायला हवे? हा प्रश्न सोपा आहे, पण उत्तर अवघड आहे. अनेक संशोधनांमध्ये पाण्याच्या बाबतीत वेगवेगळे मत व्यक्त करण्यात आले आहे. वास्तविक हे आपले कार्य आणि आसपासच्या वातावरणावर अवलंबून असते. जास्त पाणी पिणेही नुकसानकारक ठरते.


    परिस्थितीनुसार प्या पाणी :
    एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्ही जेवणात जास्त पाणी असणारे पदार्थ खात असाल तर कमी पाणी लागते. उदा. दूध, सरबत, कोल्ड्रिंक, रसाळ फळे, ताक, दही, चहा, कॉफी आदी घेतल्यास दिवसभरात घेत असलेले पाणी एक लिटरने कमी होईल.


    किती गरजेचे आहे?
    सामान्य वातावरणात व्यक्तीला दिवसभर 12-16 ग्लास (3 ते 4 लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे. वातानुकूलित वातावरणात (एअरकंडिश्नरमध्ये) जास्त काळ राहणाऱ्या व्यक्तीला 2.5-3 लिटर पाणी पिणे पुरेसे असते, तर भरउन्हात काम करणाऱ्या आणि व्यायाम करण्यासाठी 5-6 लिटर पाणी घेणे गरजेचे असते.


    असा ठेवा हिशेब
    आपल्यासाठी जग किंवा बॉटलमध्ये पाणी वेगवेगळे ठेवा. याने पाण्याचा हिशेब ठेवणे सोपे जाईल. कामामध्ये पाणी पिणे विसरून जातो. बॉटल जवळ असेल तर पाणी प्यायचे लक्षात राहील. एकदाच सर्व पाणी पिऊ नये. थोड्या-थोड्या वेळाने एक-एक कप पाणी प्यावे.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पाण्याचा कुठे उपयोग? आणि जास्त पाणी पिण्याचे तोटे...

  • water drinking tips in marathi

    पाण्याचा कुठे उपयोग?
    - पाण्यामुळे लाळ बनते, ते अन्न पचवायला मदत करते.
    - म्युकस मेंबरेन (त्वचेवरील थर) च्या मऊपणासाठी पाण्याचा उपयाेग
    - पेशींच्या निर्मितीसाठी
    - शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी
    - सांध्यात मऊपणा आणण्यासाठी
    - मेंदूत हार्मोन, न्युरो ट्रांसमीटर बनवण्यासाठी
    - शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी
    - पाठीचा कणा आणि मस्तकासाठी शॉक एब्जॉर्बरसाठी
    - अन्नाच्या पोषण द्रव्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी
    - शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी उपयोग होतो.

  • water drinking tips in marathi

    जास्त पाणी पिणेही अयोग्य
    - गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने मूत्रपिंडावर (किडनी) जास्त दाब पडतो.
    - अति पाण्यामुळे शरीरातील पेशींना इजा होऊ शकते.
    - सोडियमची प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते.
    - अति पाणी पाचक रसाचा परिणाम कमी करते. त्याने अन्न उशिराने पचन होते.
    - जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने जास्तीची चरबी बनते. त्यामुळे हे हृदयविकाराचे कारण बनू शकते.

Trending