आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरातून निळवंडेच्या दिशेने जायकवाडीसाठी पाणी सुटले, मुळा धरणातून आज झेपावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणात  पाणी सोडण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले असून गुरुवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणात हे पाणी  येईल. निळवंडे भरल्यावर पाणी जायकवाडीकडे सोडले जाईल. ४ हजार क्युसेक विसर्ग सायंकाळनंतर 10  हजारपर्यंत वाढवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मुळा धरणातून (ता. राहुरी) पाणी सोडण्यास प्रारंभ होईल.

 

दरम्यान, जायकवाडीत 8.99 टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशाविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. दिवाळीनंतरच ही सुनावणी होईल.  दुसरीकडे पाणी सोडण्यास होत असलेला विरोध पाहता मुळा धरण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, माजी आ. शंकरराव गडाखांसह नेवाशातील सहाशे शेतकऱ्यांनी गनिमी काव्यासह मुळा धरणावर जाण्याचा प्रयत्न केला. धरण पायथ्याशीच त्यांना पोलिसांनी अडवले. गडाख यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी नंतर सोडून दिले.

 

विरोधकांचे आक्षेप काय? : { समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जुन्या आकडेवारीच्या आधारे घेण्यात आल्याचा आरोप. { 23 सप्टेंबर 2016 ला हायकोर्टाने दोन्ही भागांतील साठ्यांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. { नाशिक व नगर जिल्ह्यातील पाण्याचा नव्याने आढावा न घेता फक्त जायकवाडीचा आढावा घेऊन महामंडळाने निर्णय घेतल्याचा दावा.

 

नाशिक : पाणी साेडण्याची प्रक्रिया सुरू
नाशिक जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात गुरुवारी भावली, भाम अाणि वाकी या धरणातून दारणा धरणात पाणी साेडण्यास सुरुवात झाली. हे पाणी नांदूर-मधमेश्वर प्रकल्पामार्गे जायकवाडी धरणात साेडण्यात येईल. 

 

मोटारी, पाइप काढा... दवंडी पिटवून सूचना
मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश आल्याने नदीकाठी असलेल्या मोटारी, पाइपलाइन हलवण्याचे आदेश दवंडी पिटवून देण्यात आले. पाणी सुटल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने धरणाला छावणीचे स्वरूप आले होते. 

 

या धरणांतून पाणी सोडले जाणार

1.90 टीएमसी पाणी मुळातून. 3.85 टीएमसी भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजपूर.
0.60 टीएमसी गंगापूर समूहातून (गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी)
2.4 टीएमसी गाेदावरी दारणा समूहातून (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) 
0.60 टीएमसी पालखेड समूहातून सोडले जाणार.

 

बातम्या आणखी आहेत...