आरोग्य / निरोगी यकृतासाठी पाणी, ग्रीन टी आणि कॉफी उपयुक्त ...

अनेक संशोधनात ओट्सचे सेवन करणे यकृतासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे

Oct 13,2019 12:15:00 AM IST

लिव्हर अर्थात यकृत आपल्या शरिराराचा अत्यंत महत्त्वाचा भाग, आपलं यकृत तंदुरुस्त असल की आपणही तंदुरुस्त असतो. आपल्या यकृताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच पदार्थ सांगणार आहोत.

ओट्स : अनेक संशोधनात ओट्सचे सेवन करणे यकृतासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रोज ओट्सचे सेवन करावे.


ब्रोकली : ब्रोकली आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या रोजच्या आहारात तुम्ही ब्रोकलीला उकडून सलादच्या स्वरुपात खाऊ शकता. यकृतासाठी हे फायदेशीर ठरते.


कॉफी : नियमीत कॉफी प्यायला तुम्हाला भलेही आवडत नसेल. मात्र आपल्या यकृतासाठी कॉफी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच कॉफी घेतल्याने अनेकदा तुमचा कॅन्सरपासून देखील बचाव होतो.


ग्रीन टी : ग्रीन टी देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे यकृतासंबंधीच्या आजारापासून स्वत:चा बचाव करणे सोपे आहे.


पाणी : शरिर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, पाणी आहे. तुम्ही दिवसभर भरपूर पाणी पिल्यास अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. त्यामुळे रोज जास्तीत जास्त पाणी प्या आणि निरोगी राहा.

X