आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिन्याभरानंतरही शेतात पाणी; सत्तेसाठी भांडणाऱ्या नेत्यांना आमची कीव कधी येणार ?  महिना उलटला तरी शेतकरी हवालदिल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फक्त पंचनामे, मदतीच्या नावाने बोंब
  • रब्बीच्या पिकाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही
  • पाच एकर शेती असणाऱ्यांनाही करावी लागतेय मजुरी

मंदार जोशी / महेश देशपांडे

भोकरदन - संसाराची राख रांगोळी झाली. पोटाला चिमटा देवून शेतात उभे केलेले पीक एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. डोळ्यासमोर कणसं वाहून गेले. शेतात आणि डोळ्यात पाणी दोन्हीकडचे पाणी अजून तसेच आहे. महिना उलटून गेला. शेत अजून वाळले  नाही.  सत्तेसाठी भांडणाऱ्या या  नेत्यांना कधी आमची किंवा कधीच येणार नाही. मतदान झाले आता त्याचा मतलबही संपला. लिय लिव्हतात मात्र देत मात्र काहीच नाही. लेकीचे लग्न पुढे ढकलावे लागले. पैसे नाहीत म्हणून मुलगा घरी बसला, त्याची कॉलेजची फि भर ण्ण्यासाठी पैसे नाही. घरात पावसाचे पाणी घुसले भींत कोसळली. पुढे फक्त अंधार आहे. काय करावे काहीच सुचत नाही. सरकारी कचेरीच्या खेट्या मारल्या शिवाय आता काही पर्याय नाही. त्यांना पाझर फुटेल तेव्हा फुटेल. ही व्यथा आहे. भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील शेतकऱ्यांची. अख्या मराठवाड्यात कमी अधिक  प्रमाणात हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यावर आलेल्या या आसमानी आणि सुलतानी संकटाचा दिव्य मराठीने भोकरदन तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जावून कलेलेा  ग्राऊंड रिपोर्ट. 
मागच्या महिन्यात परतीच्या पावसाने राज्याला चांगलचे झोडपले. शेतात सोंगून ठेवलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेले. जे आहे ते अक्षरश: सडले.  २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पावसाचा कहर या शेतकऱ्यांनी अनुभवला. आता एक महिना होवून गेला. तरीही परिस्थिती अजून तीच आहे. शेतात पांगून ठेवेलेले पक्का आता जागेवाच सडलाय. कणसांना कोंब फुटलय. शेत साफ करण्यासाठी मजुर मिळेना झालेया, २५० रुपयांची मजुरी साडे तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत गेली आहे.  पेरणी आणि मशागतीसाठी जेवढे पैसे  लागले तेवढे सुद्धा परत मिळण्याची चिन्हे नाहीत. सरकारी हेक्टरी आठ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन करीत आहे. ही मदत अतिशय तुंटपुंजी आहे. असेे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. किमान हेक्टरी २५ हजार रुपये तरी द्यावे जेणे करुन रब्बीचे पीक घेता येईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जमिनीची मालकीन पण दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्याची वेळ 
 
पार्वताबाई गोरे आणि सुनिता गोरे  या दोघींच्या घरी तीन तीन एकर जमीन आहे. त्यातील दोन एकरमध्ये त्यांनी मक्क्याचे पीक घेतले होते. मात्र मागच्या महिन्यात आलेल्या पावसामुळे सगळे नुकसान झाले.  जमवलेले सगळे पैसे पेरणीसाठी आणि मशागतीसाठी खर्च झाले. आलेले पीक विकूनच पुढचे नियोजन होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते  झाले. संसाराचा गाडा पुढे ढकलण्याकरीता आता या परिवाराला दुसऱ्याच्या शेतात जावून काम करण्याची वेळ आली आहे. घरात एवढी शेती असून त्यांना पहिल्यांदाच दुसऱ्याच्या शेतीत हजेरीवर कापूस वेचणीसाठी जावे लागत आहे. बळीराजाची झालेली ही अवस्था सरकारला कशी पाहवते. 


एक एकरात कापूस लावला होता. मात्र ते सुद्धा काही हातात लागले नाही. सरकार पैसे देणार असल्याचे सांगितले जाते. मात्र आमच्याकडे अजून कोणीच आले नाही. आता बचतगटाचे पैसे दोन रुपये शेकड्याने घेवून गहू लावण्याचे काम सुरु केले आहे. देवाने ते तरी पदरी पडू द्यावे हीच प्रार्थना आहे. लय लिव्हतात पण देत काहीच नाही 
 
भिंत खचली चुल विझली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले 
गंगा माय पाहुणी आली, गेली घरट्यात राहून 
माहेर वाशीन  पोरी सारखी चार भितींत नाचली 
मोकळ्या होती जाईल कशी बायको मात्र वाचली 
भिंत खचली चुल विझली होते नव्हते नेले 
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवेले 
कारभारणीला घेवून संगे सर आता लढतो आहे 
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा 
पाठी वरती होत ठेवून फक्त लढ म्हणा 
एकनाथ जानुबा भराड, भोकरदन तालुक्यातील सुरंगली या गावचे शेतकरी. सुमारे शंभरी गाठलेले वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार.  एक मुलगा शहरात देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेतो. मागच्या महिन्यात आलेल्या पावसानंतर या कुटूंबाची अवस्था अगदी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेत वर्णन केल्यासारखी झाली आहे.  वडिलोपार्जित जमिनीच्या तुकड्यावरच या परिवाराचा उदरनिर्वाह. यावर्षी शेतात मक्याचे पिक नजर लागेल असं आलं होत. भराड सांगतात किमान अडीच लाख रूपये आले असते. त्या पैशातून मुलाचे लग्न करायचे, थोडंफार घर बांधायचं आणि देणे घेणे दूर करायचे असे स्वप्न भराड यांनी रंगवले होते. हे सांगतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक बदलतात आणि साठीतले एकनाथ अचानक लहान मुलासारखे ओक्साबोक्सी रडायला लागतात. 
काय सांगु साहेब, जो पाऊस अत्तापर्यंत आपला वाटत होता त्याने अगदी राखरांगोळी केली गावातलं एकवीस खणांचं घर पडलं. शेतात राहण्याची वेळ आली. सहा एकरात मक्का लावला होता. मात्र, हातात काही लागेल याची काहीच आशा नाही. मुलाचं लग्न घर बांधणं तर दूरच मात्र, मक्का लावण्यासाठी जे कर्ज घेतलं होतं ते परत कसं करावं याचीच काळजी वाटू लागली आहे. अजूनही शेतात पाणी तसंच आहे. चिखलात पडलेले मक्क्याचे कणसं हातात घेऊन भराड दाखवतात, तुम्हीच सांगा आता काय करू?.. विमा भरला, सगळं काही केलं. सरकार पैसे देणार आहे, असं म्हणतात मात्र, अजून काहीच नाही. शंभरी गाठत आलेले जानुबा भराड म्हणतात, पावसामुळे एवढे नुकसान कधीच झाले नाही. अधिकारी येतात लै लिव्हतात, नेते येतात लै बोलतात मात्र, शेतकऱ्याला काही द्यायची वेळ आली की सगळे मागं सरकतात. हे बोलतांना एकनाथ यांची पत्नी कांता बाई यांचे डोळे पाणावले होते. नुकसान झालंय लाखान, मदत मिळते हजारानं

कधी नाही तर शेत यावेळी खुलंल होतं. मक्का सोंगुन शेतात ठेवली होती. मशीन मधून काढायची आणि बाजारात न्यायची याचे नियोजन सुरू होते. पाच एकरात यावेळी मक्का घेतली होती. किमान दिडशे क्विंटल उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. अडीच लाख रूपये घरात येतील. त्यातून मुलीचे लग्न करू. असे नियोजन होते. दिलीप सुधाकर बुलगे यांचे सुरंगलीजवळ जुई नदीच्या पात्राजवळ शेत आहे. २१ सप्टेंबरला ढगफुटीसारखा पाऊस झाला. शेतात नदीचं पाणी घुसलं आणि हाताशी  आलेलं सगळं पीक गंगामायला अर्पण झालं. असे बुलगे सांगतात. 
एक महिन्यानंतरही रानात नांगर नेता येत नाही. अजूनही शेतातला चिखल तसाच आहे. कसेबसे शेतात विखुरलेले कणंसं गोळा करण्याचे काम सुरू आहे. काही कणसांना तर जागेवरच कोंब फुटले. सरकारने मदत जाहिर केली आहे,  असे कळते. हातात मात्र  अजून काहीच नाही. ग्राम सेवक सांगतात हेक्टरी ८ हजार रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. यातून पेरणी साठी घेतलेले देणे घेणे करावे की, पुढच्या पिकासाठी शेत तयार करावे, केवळ थट्टा आहे. नुकसान लाखाेंचं आणि भरपाई मात्र हजारांमध्ये त्याचीही शाश्वती नाही. असे सांगत बुलगे विचार करत शुन्यात जातात. सरकारची मदत ६ हजार ८०० शेतकऱ्यांचा किमान खर्च २४ हजार ५००
 
भोकरदन तालुक्याचे उदाहरण घेता या तालुक्यात १५७ गावे आहेत. यात किमान ९४ हजार ८७६ शेतकरी आहेत. २१ हजार १७६ हेक्टर जमिनीवर मक्क्याचे लागवड झाली आहे. याशिवाय सोयाबिन, कापूस, बाजरी ही  महत्वाची पिके आहेत. एकूण १ लाख ३ हजार ४५७ हेक्टरवर लागवड झाली असून ८८ हजार ५२० हे बाधित क्षेत्र आहे. सरकारने प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकर साठी ६ हजार ८०० रूपयांची नुकसान भरपाई घोषित केली आहे. पाच एकर पर्यंत म्हणजेच दोन हेक्टर पर्यंत ही मदत मिळणार आहे. ज्यांची जमिन एका हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांना ६८ रूपये गुंठ्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. 

शेतकऱ्यांची मागणी २५ हजार रूपये


सरकारने प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रूपये नुकसान भरपाई घोषित केली असली तरी, शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. मक्का पिकासाठी हेक्टरी लागणारा किमान खर्च.
नांगरणी, वखरणी - २५०० रूपये 
पेरणीसाठी मजुरी - १५०० रूपये
बियाणे व खत - ७५०० रूपये
निंदणी व खुरपणी - २००० रूपये
सोंगणी आणि काढणी - ५००० रूपये
एका हेक्टरमध्ये किमान ४० क्विंटल मक्का येईल अशी अपेक्षा आहे. 
मळणी यंत्रासाठी लागणारा खर्च - ४००० रूपये
पिक बाजारात नेण्यासाठी व अडत आणि हमालीसाठी - २००० हजार रूपये

एकूण खर्च - २४,५००


यावर्षी मक्क्याचे उत्पादन चांगले आले होते. किमान त्यासाठी १८०० रूपये भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे हेक्टरी किमान ७२ हजार रूपयांचे उत्पन्न झाले असते. 

विमाधारक शेतकऱ्यांसाठी
 
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा विमा काढला असेल त्यासाठी त्यांना सरकारी अनुदानाशिवाय विम्याची वेगळी रक्कम विमा कंपन्यांकडून मिळू शकते. त्यासाठी त्यांनी प्रति हेक्टरी मक्क्यासाठी ५५०रुपये एवढा प्रिमियम भरला असून त्यापोटी विम्याची २७ हजार ५०० रुपये रक्कम मिळू शकते. त्यासाठी विमा कंपन्यांनी १०० टक्के नुकसान भरपाई देणे  आवश्यक आहे. नाहीत उंबरठा उत्पन्न काढून त्या नुसार  जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढेच पैसे मिळतील. या बाबत मात्र सर्व शेतकऱ्यांमध्ये सभ्रंम असून विमा कंपन्यांनी  त्या बाबत काहीही स्पष्टीकरण दिले नाही. 

गावाची आर्थिक परिस्थिती बिघडली.
 
तालुक्यात बहुतांश कुटूंबाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. संपूर्ण गावाचे अर्थचक्र हे शेतीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारीत आहे. एकट्या सुरंगली गावात १२८३ शेतकरी अनुदानपात्र आहेत. त्यापैकी फक्त ६०० शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे सुमारे ६०० पेक्षा जास्त शेतकरी अगदी तोट्यात आहेत. ही परिस्थिती फक्त एका गावाची आहे. ग्रामसेवक जी. बी. समिंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचनामे पूर्ण झाले असून हेच पंचनामे कृषि खात्यासठी सुध्दा ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळेल अशी  अपेक्षा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...