आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळ्यात विस्कळीत पाणीपुरवठा, टँकर न अाल्याने रहिवाशांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील वडाळागावातील अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बाबींमुळे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. वडाळागावात एेन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे या भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गुरुवारी (दि. १६) या परिसरात दिवसभर टँकर न अाल्याने नागरिकांची धावपळ झाली.


शहरात मोठ्या प्रमाणावर पाउस सुरू असताना ही तसेच धरणात पाणीसाठा वाढलेला असतानाही शहरातील डीजीपीनगर ते थेट वडाळागाव तसेच अण्णा भाऊ साठे वसाहतीपर्यंत गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. वडाळागावातील अनेक भागात असाच प्रकार सुरू असून अनेक कुटुंबांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारीवरुन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वडाळागावातील महेबूबनगर, सादिकनगर, गुलशननगर, मदारनगर, साठेनगर, सेंट सादिक स्कूल परिसरासह अर्ध्या वडाळागावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

 

व्हॉल्व्हमनकडूनच दुर्लक्ष
दरम्यान, स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाकडून यावर उपाययोजना केली जात नाही. या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू होता मात्र, व्हॉल्व्हमनकडून अचानक पाइपलाइनचा कॉक बंद करण्यात आल्याने परिसरात पाणीपुरवठा झाला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...