आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांमध्ये पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत होणार वाढ; नांमकामधून गोदावरीत ३,१५५ क्युसेकने विसर्ग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदूर- मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अशा प्रकारे वाहत आहे. - Divya Marathi
नांदूर- मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अशा प्रकारे वाहत आहे.

पैठण - नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नाशिकमधून गोदावरी नदी पात्रात पाणी येत असले तरी सध्या गोदावरीत केवळ नांदूर मधमेश्वरचे ३,१५५ क्युसेकने पाणी येत असून हे पाणी जायकवाडी दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता राजेंद्र काळे दिली.


तीन दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस होत आहे. नाशिकच्या नद्यांना पूर आल्याने हे पाणी जायकवाडी येईल असा अंदाज होता. मात्र, नाशिक भागातील धरणाचा पाणी साठा कमीच असल्याने सध्या केवळ गोदावरीत पाणी येत असल्याने पाणी नांदुर मधमेश्वर मध्ये येत आहे. ते पाणी साेमवारी सकाळी जायकवाडीच्या दिशेने येत असल्याने जायकवाडी दाखल होईल. सध्या जायकवाडीचा पाणी साठा मृत साठ्यात असून यातून देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने हे धरण क्षेत्र कोरडे पडले. येणाऱ्या पाण्यावरच अाता आस निर्माण झाली आहे. मात्र ते किती दाखल होईल हे सांगता येणार नाही असेही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


जायकवाडी धरण क्षेत्रात जुनच्या पावसाने एक थेंब ही पाणी वाढ झाले नाही. त्यातच धरण परिसरात पाऊस झाला नसल्याने जायकवाडीच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या धरणात मृत साठा असून आता नांदुर मधमेश्वरतून ३१५५ क्युसेक वेगाने गोदावरी पाणी येत आहे.  तरी प्रत्यक्षात जायकवाडी कमी वेगाने पाणी येईल असा अंदाज असून गोदावरी नदी पात्र कोरडे असल्याने पाणी झिरपण्याचे प्रमाण अधिक राहणार अाहे. दोन दिवसात धरणाच्या साठ्यात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.
 

 

पाण्याला नदीतील खड्ड्यांचा अडथळा, पाणी नदीपात्रात जास्त आटणार
जायकवाडीत आज जे गोदावरीमार्गे नांदुर मधमेश्वरचे पाणी येत आहे. ते प्रत्यक्षात जायकवाडी किती येणार हा प्रश्न असून नदी पात्रात मोठ मोठे खड्डे असल्याने या खड्ड्याचा अडथळा येणाऱ्या पाण्यासाठी असणार आहे. शिवाय धरण क्षेत्रात अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसल्याने पाणी नदी पात्रात जास्त आटणार आहे. नाशिक भागात पाऊस सुरू झाला असला तरी तो जास्त असल्याने आवकीवर जायकवाडीत वाढ होणार आहे.

 

नांमकातून आवक सुरू झाली 
धरणात मागील वर्षी १७ जुलै रोजी नांदुर मधमेश्वर मधून ३५०० क्युसेकने आवक सुरू होती. त्यानंतर झालेल्या पावसाने ही आवक मधमेश्वर २९५०० वर आली होती. तर जायकवाडी प्रत्यक्षात १८१०० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत होते. आज जरी नांमकाचे पाणी गोदावरी सोडण्यात येत असले तरी हे पाणी जायकवाडी येणार की नाही हे मंगळवारी रात्री स्पष्ट होणार आहे.

 

पाणी वेळेवर सोडले जात नाही
जायकवाडी समन्यायी पाणी वेळेवर सोडले जात तर नाहीच शिवाय पावसाळ्यात देखील अगोदर वरील भागातील धरणे भरल्या शिवाय पाणी खाली सोडण्यात येत नाही. त्यामुळे मागील वर्षी धरणाचा साठा ४७ टक्क्यांवरच राहिला होता. त्यानंतर समन्यायी पाणी वाटपात ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यापैकी केवळ चार टीएमसी पाणी जायकवाडीत आले होते.

बातम्या आणखी आहेत...