आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेंभुर्णी- मुसळधार पाऊस सुरू असल्यानेे भीमा खोऱ्यातील ११ धरणांतून ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. बंडगार्डन येथून ३८ हजार तर दौंड येथून ५४ हजार क्युसेक पाणी उजनी धरणात मिसळत होते. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी दोन ते तीन दिवसांत ९० टक्केपर्यंत जाणार आहे.
मंगळवारी सायंकाळी उजनी ६६ टक्के भरले होते. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत कधीही पाणी सोडले जाऊ शकते. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापनाने दिला आहे. भीमा खोऱ्यातील अनेक धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला १८ हजार ४९१ क्युसेक, चासकमान ९ हजार १२५, मुळशी १० हजार १६०, वडजगाव ६ हजार, पानशेत ५ हजार ४७८, डिंभे ५ हजार ४७०, पवना धरणातून ४ हजार ३२६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. असा एकूण ६७ हजार ८५८ क्युसेक विसर्ग होत आहे.
नीरा खोऱ्यातील गुंजवणे धरणातून ३ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे. दुपारी चार वाजता पारगाव येथून ५४ हजार क्युसेक विसर्ग चालू होता. या विसर्गामुळे दौंडच्या विसर्गात बुधवारी सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात ९८.६९ टीएमसी पाणीसाठा झाला असून ३५.०३ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.