आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उन्हाळ्यातील पाण्यासाठीची वणवण काही नवी नाही. ग्रामीण भागात तर मोठे हाल होतात. देवराई गावातील महिला पाण्यासाठी गावापासून दूरवरील अंदाजे एक-दीड किलोमीटरवरील शेतातील पाणी असलेल्या विहिरीवर जात. सरत्या उन्हाळ्यात गावक-यांना पिण्याच्या पाण्यासाठी तोच आधार होता. श्रीमंत बागायतदार शेतक-यांच्या शेतातील विहिरीवर गावकुसाबाहेरील तांड्यावरील लोकांना पाणी भरण्याची सोय नव्हती. परिणामी सा-या गावाला याच विहिरीचा आधार होता. नेहमीप्रमाणे एके दिवशी दुपारी पाच-सहा महिलांचा घोळका पाण्यासाठी दूरवरील शेताकडील विहिरीकडे निघाला. महिलांच्या गप्पांना ऊत आला होता. डोक्यावर व कमरेत माठ-कळशा असत. एका चकरेतच पाणी आणण्याच्या अपरिहार्यतेमुळे स्पर्धाच चालल्यासारखे वाटत होते. त्या विहिरीवर गेल्या. पाणी पिऊनते भरलं अन् निवांत सावलीला बसल्या. सुखदु:खाच्या गप्पा मारत घटकाभरानं ऊन कलल्यानंतर निघाल्या. एक म्हातारी बाई एक माठ-दोन कळशा पाणी घेऊन निघाली. गाव जवळ येताच काहीशा अशक्तपणामुळे वा हाताला कळ लागल्यामुळे म्हणा, तिच्या कमरेवरील माठ हळूच सटकला व पडला. तसा बायकांचा एकच कल्ला झाला. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.‘अगं ए सुरवंता, आणि त्या म्हातारीच्या पाण्याचं काय ग?’ आता ती हिरमुसली. एक तर मडके फुटले. पाणी वाया गेलं. आता एवढ्या दुरून पाणी कोण आणणार? मग एका वयस्क बाईनं शक्कल लढवली, ही तर थकली, परत कोण जाणार? हे बघा बायांनो, आपण सर्वांनी एक-एक तांब्या पाणी दिलं तर कळशीभर होऊन जाईल. म्हातारीला पाणी दिल्याचं पुण्य लागंल. सर्व बायांनी लगेच होकार भरला. ती बाई पण खुश झाली. जणू तिचा थकवा व ताणच पळाला. गावगाड्यातील या प्रेमानं सर्वांनाच भरतं आलं.
अनोखी पैज, ३० वर्षानंतरही अपराधीपणाची भावना
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.