आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्याने गाळून पीत आहेत चिखलाचे पाणी; गुरेही पिणार नाहीत असे पाणी आदिवासींना प्यावे लागते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महाराष्ट्रात १९७२ पासून आतापर्यंतचा सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे. पाणीटंचाई एवढी की गावांतील लोकांना नाइलाजाने चिखलाचे पाणी कपड्यानेे गाळून प्यावे लागत आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. १३ हजारपेक्षा जास्त गावे-वाड्या संकटात आहेत. स्थिती एवढी वाईट आहे की राज्याच्या जलाशयांत १४% पाणी उरले आहे. तेही आता आपत्कालीन स्तरावर आहे. १८ मे रोजी २६ धरणांतील पाणीपातळी शून्यावर गेली. गेल्या वर्षी हा आकडा २६% होता. राज्याने कर्नाटककडून तीन टीएमसी फूट पाण्याची मागणी केली आहे. चारा छावण्यांत रोज प्रति जनावर १०० रु. अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसेच २०११ च्या लोकसंख्येएेवजी २०१८ च्या लोकसंख्येच्या आकड्याचा आधार घेऊन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

 

देशातील ९१ प्रमुख धरणांत फक्त २२% पाणी, ६ राज्यांत संकट

> दुष्काळाचे संकट देशभर आहे. केंद्रीय जल आयोग देशातील प्रमुख ९१ धरणांची निगराणी करते. आयोगाने सांगितले की, ३५.९९ अब्ज घनमीटर एवढेच पाणी शिल्लक आहे, ते क्षमतेच्या २२% च आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत मोठी टंचाई आहे. 


> महाराष्ट्रातील ४,३३१ गावे आणि ९,४७० वाड्यांत ५,४९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ६७ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ४,४१२ कोटी रुपये दिले. लोकांना आपला रोजगार सोडून पाण्यासाठी दिवसभर अनेक किलोमीटर फिरावे लागत आहे.


> महाराष्ट्रात सर्वात वाईट स्थिती मराठवाड्यात आहे. तेथील अनेक गावे रिकामी झाली आहेत. लोक स्थलांतर करत आहेत. जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात २० दिवसांत एकदा पाणी येते. लातूरमध्ये १० दिवसांनी पाणी येते. विशेष म्हणजे २०१६ मध्ये तेथे रेल्वेने पाणी पुरवावे लागले होते.
 

सूर्य के प्रचंड साम्राज्य तले 

इस भरे-पूरे उजाड़ में 
केवल कीचड़ में बच रही थी नमी
नामुमकिन था उसमें से भी निथार पाना
चुल्लू भर पानी।
-  वीरेन डंगवाल

 

बातम्या आणखी आहेत...