आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत आले केटीवेअरचे अडवलेले अडीच दलघमी पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दारणा धरणातून सोडलेले आणि केटीवेअरमध्ये अडवलेले पाणी जायकवाडीत सोडण्यास रविवारी रात्रीपासून सुरुवात झाली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जायकवाडीत २.७१ दलघमी पाण्याची आवक झाली. केटीवेअरमधून अजूनही ७०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. निळवंडेचे पाणी जायकवाडीत दाखल झाले आहे. सध्या निळवंडेमधून सोडलेल्या विसर्गातून जायकवाडीत ७९४ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

 

गंगापूर, पालखेडचे थांबवलेले १.२० टीएमसी पाणी दारणा धरणातून सोडण्यात आले होते. मात्र नांदूर-मधमेश्वरसह खालच्या १३ केटीवेअरमध्ये अडवले होते. गेल्या तीन दिवसांपासून हे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. आणखी एक दिवस केटीवेअरच्या पाण्याचा विसर्ग कायम राहण्याची शक्यता आहे. 

 

आठवडाभर सुरू राहणार निळवंडेचा विसर्ग 

कमलापूर बंधाऱ्यातून रविवारी रात्री १० वाजता ३००० क्युसेक विसर्ग सुरू होता. सोमवारी रात्री आठ वाजता हा विसर्ग १०५९ क्युसेक तर मंगळवारी ७०० क्सुसेक सुरू आहे. त्यामुळे बुधवारच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने २००० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आणखी आठवडाभरापेक्षा अधिक काळ निळवंडेतून विसर्ग सुरू राहील. या धरणातून जायकवाडीत १.८ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...