आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आज २ तास विलंबाने पाणीपुरवठा; फारोळ्यात शॉर्टसर्किट; अडीच तासांत दुरुस्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या चार दिवसांपासून जायकवाडी पंपहाऊस आणि सबस्टेशनमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुरुवारी पुन्हा फारोळा केंद्रात विजेच्या खांबावरील वेलीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे शहराकडे येणारे पाणी आणि जलशुद्धीकरण बंद होते. महावितरण आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी अडीच तासांत दुरुस्ती केल्यानंतर काही वेळातच शहराला पाणी मिळाले. असे असले तरी शुक्रवारी काही ठिकाणी एक तास, तर काही ठिकाणी दोन तास विलंबाने पाणीपुरवठा होईल. 


शहराची पाणीपुरवठा यंत्रणा कालबाह्य झाल्याने पाणी वितरणातील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारचा बिघाड वेळेत दुरुस्त झाला. मात्र काही वेळ उपसा बंद असल्याने शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार आहे तेथे एक ते दोन तासांचा उशीर होईल. दरम्यान, पाणी मिळत नसल्याने सिडको एन-६ येथील नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...