आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना टोळक्याकडून मारहाण:जलकुंभावर घडला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आमच्या वॉर्डाला पाणी का नाही सोडले? असे म्हणत १२ ते १५ जणांच्या टोळक्याने सिडको एन-५ येथील जलकुंभावरील ४ पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री ११.३० ते १२.०० वाजेच्या दरम्यान मारहाण केली. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासूनच शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्युत दुरुस्ती आणि जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारामुळे शहरात अाधीच पाण्याची बोंबाबोंब आहे. 


सोमवारी रात्री भीमसेन परदेशी, काशीनाथ राठोड तसेच मरिमाता जलकुंभावरील अंकुश पोटकुळे व दत्तात्रय दांडगे हे कर्मचारी एन-५ च्या जलकुंभावर होते. तेथे आलेल्या १२ ते १५ जणांच्या टोळक्याने आमच्या भागाला पाणी का नाही सोडत? असे म्हणत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्वच जण गांगरून गेले. टोळक्यातील काहींनी दत्तात्रय दांडगे यांना थेट संप (छाेटी टाकी) वरून खाली फेकले. यामुळे त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. इतर कर्मचाऱ्यांनाही घाटी रुग्णालयात हलवले आहे. सिडको एन-७ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पाणीपुरवठा उपअभियंता अशोक पदमे यांनी रात्री १२.१५ ला येऊन कर्मचाऱ्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच पुढील काम करण्यासाठी अन्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.  सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पाेलिस व मनपा फुटेज तपासत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...