आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टरबुजाने सुधारेल पचनशक्ती... हदय, डोळे, केस राहतील स्वस्थ 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जासुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशीदेखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. शरीराला साखर आणि पाण्याचे संतुलन मिळवून देणाऱ्या फळांना उन्हाळ्यात विशेष मागणी असते. उन्हाच्या काहिलीपासून गारवा देणाऱ्या हंगामी फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहू शकते. येथे जाणून घ्या, टरबुजाचे खास आरोग्यदायी फायदे आणि घरगुती उपाय... 


- टरबुजामध्ये ९० टक्के पाणी असते. हे खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता येत नाही. सोबत यामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी'देखील असतात. टरबूज असेच खाता येते किंवा त्याचा ज्यूसदेखील करता येतो. फ्रूट सॅलडमध्येदेखील कलिंगड ठेवता येते. 


- टरबूज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि लठ्ठपणासुद्धा कमी करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी टरबूज गुणकारी आहे. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत करण्यास मदत होते. 


कॅन्सर 
टरबूज अँटीऑकसीडेंट आणि व्हिटॅमिन सी तसेच इतर अँटीऑकसीडेंटचा उत्तम स्रोत आहे. हे कॅन्सरचे कारण मानल्या जाणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यास सक्षम आहे. अनेक संशोधनांमध्ये लाइकोपेनचे सेवन प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. टरबूजामध्ये लाइकोपेन तत्त्व आढळून येते. 

- आधुनिक विज्ञानही टरबूजाला वायग्रापेक्षा जास्त प्रभावकारी मानते. दररोज टरबूजाचे सेवन केल्यास प्रणय शक्ती वाढते. एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे, की टरबूजामुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. 


हृदय स्वस्थ राहते : टरबुजामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम तत्त्व हृदयाला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी सहायक ठरते. डब्ल्यूएचओ सर्व्हेनुसार हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी व्यक्तीने एक दिवसामध्ये ३,५१० मिलिग्रॅम पोटॅशियम ग्रहण करणे आवश्यक आहे. टरबूज तुमची ही गरज भागवू शकते. 


डोळ्यांसाठी फायदेशीर : टरबुजाचे नियमित सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर राहते. यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळे स्वस्थ ठेवण्यात मदत होते. याच्या सेवनाने रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहता येऊ शकते. 


त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : सी व्हिटॅमिनचे पुरेसे सेवन कोलेजनचे निर्माण करण्यासाठी आवश्यक असते. हे त्वचा व केसांसाठी संरचना तयार करते. टरबूज शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते,जे त्वचा आणि केस स्वस्थ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे याच्या सेवनाने शरीर नेहमी सशक्त राहते. सुरकुत्या नष्ट होतात. 


किडनी स्टोन होतो दूर : टरबूज खाल्ल्याने मुतखडा (किडनी स्टोन) दूर होण्यास मदत होते. यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम किडनीला स्वस्थ ठेवते. हे लघवीतील अॅसिडचा स्तर नियंत्रणात ठेवते. पोटॅशियमसोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. यामुळे किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत मिळते. नियमितपणे टरबुजाचे सेवन केल्यास किडनी स्टोन होण्याचा धोका राहत नाही. टरबुजाच्या बिया खाल्ल्यानेही लाभ होतो. 


पचनासाठी उपयुक्त : टरबुजामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे अपचन, गॅस अशा समस्या होत नाहीत. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी टरबूज उपयोगी फळ आहे. 


वजन कमी करण्यात सहायक : टरबूज वजन कमी करण्यासाठी सर्वात उत्तम फळ आहे. यामध्ये असलेले सिट्रयूलाइन नावाचे तत्त्व शरीरातील वसा कमी करण्यास मदत करते. हे तत्त्व वसा तयार करणाऱ्या पेशींना कमी करते. टरबुजामध्ये असेलेले पाण्याचे जास्त प्रमाण डायटिंगदरम्यान एक उत्तम पर्याय ठरू शकते. या व्यतिरिक्त टरबुजामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. 


मांसपेशीसाठी फायदेशीर : टरबुजामध्ये भरपूर प्रमाणात असलेली पोटॅशियमची मात्रा नर्व्हस सिस्टिम आणि मांसपेशी स्वस्थ ठेवण्यात सहायक ठरते. याच्या सेवनाने मांसपेशीशी संबंधित समस्येपासून दूर राहणे शक्य आहे. तसेच टरबूज आणि टरबुजाचा रस मांसपेशीच्या वेदना कमी करण्यास मदत करतो. 


प्रतिकारशक्ती वाढते : टरबुजामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण ताप व संक्रमणापासून (इन्फेक्शन) दूर राहू शकतो.