आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • We Are Also Optimistic About The Shiv Sena Alliance, The Door Is Always Open For Positive Discussion! Chandrakant Patil

शिवसेनेशी युतीबाबत आम्हीही आशावादी, सकारात्मक चर्चेसाठी दारे नेहमीच उघडी! - चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : शिवसेना आणि भाजप हे दाेन्ही पक्ष जुने मित्र असून, ते पुन्हा कधीही एकत्र येऊ शकतात या माजी मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्या वक्तव्याने पुन्हा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली हाेती. ताेच धागा पकडून भाजपही युतीसाठी तयार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. 'आम्हाला काेणताही अहंकार नाही. युतीबाबत आम्ही आशावादी आहाेत. शिवसेनेशी चर्चेसाठी आमची दारे नेहमी उघडी आहेत,' असे सांगून पाटील यांनी पुन्हा मैत्रीसाठी एक हात पुढे केला आहे.

पुण्यात पत्रकारांशी बाेलताना पाटील म्हणाले, 'भाजप व शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. गेली ३० वर्षे आम्ही एकत्र काम केले. दाेघांचे रक्त हिंदुत्व आहे. युतीलाच जनादेशही मिळाला हाेता. या दाेन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येऊन सरकार स्थापन करावे याबाबत आम्ही आशावादी आहाेत. आम्हीच पुढाकार घेऊन शिवसेनेला संपर्क केला हाेता, मात्र त्यांनी उत्तर दिले नाही,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

'भाजपत नाराजी वाढत आहे का?' या प्रश्नावर पाटील म्हणाले, 'पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नाराज असल्याच्या बातम्यांत तथ्य नाही. पंकजा या लहान असल्यापासून संघ, भाजपचे काम पाहत आहेत. घरातून मिळालेल्या बाळकडूमुळे त्या दाेन वेळा अामदार, मंत्री झाल्या. अशा चुकीच्या बातम्यांमुळे त्यांच्या मनालाही त्रास हाेत असेल. गाेपीनाथगडावर त्या भूमिका स्पष्ट करतीलच. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी गाेपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवण्याचे काम केले आहे. पक्षाला नुकसान हाेईल, अशी काेणतीही कृती ते करणार नाहीत. त्यांचे काही म्हणणे हाेते व ते मी एेकले असून पक्षविराेधी काम करणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल,' असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
 

बातम्या आणखी आहेत...