International Special / 'आम्ही युद्धासाठी तयार आहोत, युद्ध झाले तर त्याला सर्वस्वी भारत जबाबदार असेल'- इम्रान खान

पाकिस्तानच्या स्वातंत्रदिनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये बोलत होते पाक पंतप्रधान
 

दिव्य मराठी वेब

Aug 14,2019 06:21:01 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, आम्ही युद्धासाठी तयार आहोत आणि जर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर यासाठी सर्वस्वी भारत जबाबदार असेल. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसावर पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये आले होते. येथे त्यांनी लोकांना संबोधित केले. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यावर आणि राज्याची पुनर्चना केल्यामुळे पाकिस्तान गडबडून गेला आहे. पाकिस्तानने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पाकिस्तान कधीही युद्धासाठी तयार आहे आणि जर भारत-पाकमध्ये युद्ध झाले, तर त्याला भारत जबाबदार असेल.

काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, असे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने यावेळी म्हटले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद न मिळाल्यानंतर पाकिस्तानने आता युद्धाची धमकी देणे सुरु केले. यापूर्वीही पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली होती. काश्मीरप्रश्नी नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले. भारताने यावर तुर्तास कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.


"नरेंद्र मोदींनी हे जे कार्ड खेळले, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचाच एक भाग होता. काश्मीरमध्ये जे पाऊल उचलले, त्याने कर्फ्यू हटल्यानंतर काय परिस्थिती होईल याची आम्हाला भीती आहे. एवढी फौज पाठवा, नंतर पर्यटकांना काढून द्या एवढे करण्याची काय गरज होती. हे काय करायला निघाले आहेत? मी याला नरेंद्र मोदी यांचे धोरणात्मक ब्लंडर मानतो. त्यांनी त्यांचे शेवटचे कार्ड वापरले. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना हे महागात पडणार आहे," अशी पोकळ धमकीही इम्रान खानने दिली.


भारत काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची भीतीही इम्रान खानने व्यक्त केली. "आम्हाला माहिती मिळाली आहे. सुरक्षेसंबंधी बैठक झाली, पाकिस्तान सैन्याला भारताच्या प्लॅनविषयी पूर्ण माहिती आहे. पुलवामानंतर भारताने ज्या पद्धतीने बालाकोटमध्ये कारवाई केली, त्यापेक्षाही भयंकर कारवाईचा प्लॅन पीओकेमध्ये केल्याची आम्हाला माहिती आहे. मी नरेंद्र मोदींना इथून आव्हान देतो, की तुम्हा कारवाई करा, आम्ही त्याला सडेतोर उत्तर देऊ.

X
COMMENT