National / करतारपुर कॉरिडोरचे काम सुरू, याला पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत- इम्रान खान


कॉरिडोरचे उद्घाटन यावर्षी नोव्हेंबरमध्ये होईल- फिरदौस

Aug 25,2019 11:00:00 PM IST

इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने आज(रविवार) सांगितले की, करतारपूर कॉरिडोरचे काम सुरू आहे आणि याला पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. पाक पंतप्रधान इम्रान खानचे विशेष प्रतिनिधी फिरदौस आशिक अवानने सांगितले की, आम्ही कॉरिडोरला गुरुनानकांच्या 550 व्या जयंतीच्या आधीच पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत गेल्यानंतर पाकिस्तान सरकारचे हे विधान पुढे आले आहे.


फिरदौस आशिकने ट्वीट केले- ''करतारपूर शिख समुदायाचे एख पवित्र स्थान आहे आणि ही सद्भावाचे एक चांगले उदाहरण आहे. आम्ही त्या रिपोर्ट्सला अमान्य करतोत, ज्यात दोन्ही देशांमधील वाढत्या तनावामुळे कॉरिडोरचे काम बंद केल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही देशांचे संबंध सध्या कसेही असो, पण शिखांचे धर्मस्थान दरबार साहिब करतारपूरमध्ये भाविकांसाठी दार नेहमी उघडे असतील."


कॉरिडोरचे उद्घाटन यावर्षी नोव्हेंबरमध्ये होईल- फिरदौस
ते पुढे म्हणाले, "वाढत्या अतिरेकीपणा आणि असहिष्णुतेच्या जगात करतारपूर कॉरिडोर आदर आणि सहिष्णुतेचा संदेश देतो. पाकिस्तानच्या ध्वजातील पांढरा रंग अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करतो आणि तो सरकारला हिरव्या रंगा इतकाच हवा आहे. करतारपूर कॉरिडोरचे उद्घाटन यावर्षी नोव्हेंबरमध्ये केला जाईल. या संबंधी भारत सरकारसोबत कार्यक्रम आणि नियमांविषयी चर्चा केली जाईल."


31 ऑक्टबरपर्यंत पूर्ण होण्याची आशा
करतारपूर कॉरिडोर पंजाबमध्ये गुरदासपूरपासून तीन किलोमीटर दूर भारत-पाकिस्तानच्या सिमेवर आहे. शीख श्रद्धाळू या कॉरिडोरमधून पाकिस्तानमधील ऐतिहासिक गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत जाऊ शकतात. 1539 मध्ये गुरूनानक देवने आपल्या जीवनातील शेवटचा काळ या ठिकाणी घालवला होता. कॉरिडोर गुरू नानक देव यांच्या 550 वी जयंती 31 ऑक्टोबरपूर्वी तयार होण्याची आशा आहे.

X