आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • We Are Not Interested In Debate And Sarcasm, It Is To Prove The Dominance Of Test Cricket Too: Virat

वादविवाद व शेरेबाजीत आम्हाला रस नाही, कसोटी क्रिकेटमधीलही वर्चस्व सिद्ध करायचे आहे : विराट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्वाच्य भाषेतील शेरेबाजी आणि वैयक्तिक पातळीवरचे वादविवाद यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शुक्रवारी पहाटे रवाना झाली. दौऱ्यावर रवाना होण्याआधीच्या पूर्वसंध्येला कप्तान विराट कोहली म्हणाला, ‘धोनीकडून भारतीय संघाच्य नेतृत्वाची धुरा स्वीकारल्यापासून माझ्यात खूपच बदल झाला आहे. यापूर्वी अशा खोडकर व खट्याळ हरकती करण्यात व प्रत्युत्तर देण्यात मला रस वाटायचा. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. वादविवादाशिवायही खेळता येते. वैयक्तिक पातळीवर तर ते मला मान्य आहे. भारतीय संघाने यापूर्वीही असे वादविवाद, शेरेबाजी किंवा अन्य वादग्रस्त गोष्टींना सुरुवात केली नव्हती. या वेळी आम्ही करणार नाही. मात्र, प्रतिस्पर्ध्यांनी तशी वेळ आणली तर सडेतोड प्रत्युत्तर देण्यासही कमी पडणार नाही’, असे भारतीय कप्तानाने स्पष्ट केले आहे.  


प्रतिस्पर्ध्यांना चांगले, दर्जेदार आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे असल्यास आम्हीही सकारात्मकच प्रतिसाद देऊ. मात्र, परिस्थितीचा दबावाला बळी पडून प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून आगळीक होत गेली तर मात्र आम्हीही ‘मुहतोड’ जबाब देऊ असे कोहली म्हणाला.  

 

- भारतीय संघात अजूनही सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. वैयक्तिक पातळीवर माझ्यातही अजून काही सुधारणा कराव्या लागतील. संघातील प्रत्येकानेदेखील हीच जबाबदारी स्वीकारून वागले पाहिजे, स्वत:च्या खेळात सुधारणा केली पाहिजे.

 
-  इंग्लंड दौऱ्यानंतर आम्ही एकत्र बसून काय चुकले याचा उहापोह केला होता. आम्ही इंग्लंडमध्ये चांगले क्रिकेट खेळलो. पण चुका टोकाच्या केल्या, त्यामुळे हरलो.  

 

- बिकट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च सोडवला पाहिजे. मी  चुकांमधून शिकलो. सुधारणा केल्या. संघातील  खेळाडूकडूनही मी त्याचीच अपेक्षा करत आहे.  

 

- वनडे व टी-२० क्रिकेटमध्ये सर्व मातब्बर संघांवर वर्चस्व राखू शकलो. मात्र, परदेशात जाऊन मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना हरवणे आम्हाला कसोटीमध्ये ते करता आले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत अधिक उत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पराजयातून जसे आम्ही शिकलो तसे विजय मिळवण्यासही कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या त्याचा अभ्यास आम्ही केला आहे. 

 

- ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या काही वेळा ‘बोअरिंग’ असतात. गोलंदाजाला विकेटच मिळत नाही. अशा वेळी संयम राखणे, लाइन-लेंग्थ न बिघडू देणे महत्त्वाचे आहे. विशेषत: मध्यमगती गोलंदाजांना ते लक्षात ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियात यशस्वी ठरणाऱ्या मॉर्केल, कॅलिस, रबाडा यांच्यासारख्या गोलंदाजांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा लागेल.  

 

- कुकाबुरा बॉल काही वेळा स्विंग होतही नाही. अशा वेळी गोलंदाजांच्या मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी लागणार आहे.  

 

- फलंदाजांना या वेळी यशासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजी कशी उत्तम करतात यावरच दौऱ्यावर आम्ही अधिक लक्ष देणार आहोत.   

 

-आम्हाला लोअर ऑर्डर बॅट्समनकडून धावांचे योगदान हवे आहे. इंग्लंडमध्ये त्यांच्या तळाच्या फलंदाजांच्या धावांमुळेच निकालात फरक पडला. आम्हाला तेथेच धावांची गरज आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक फलंदाजीला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे.  

 

- आम्हाला या पातळीवर बॅट कशी यायला हवी, डोके कुठे असायला हवे असे सांगण्याची गरज नाही, तर प्रत्येकाचे ‘व्यवस्थापन’ योग्य करणे गरजेचे आहे. रवी शास्त्री यांनी त्याबाबतीत उत्तम तयारी करून घेतली आहे.  

 

- रवी शास्त्री : आम्ही जिंकायलाच चाललो आहोत, हे ब्रीदवाक्य अजूनही कायम आहे. कठीण परिस्थितीत आणखी कठोर होऊन योगदान द्यायचे ही शिकवण या संघाला दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात मालिका जिंकली नसली तरीही प्रगतिपथावरच आहोत.

 

- संघातील प्रयोग व वगळण्याचे सत्र आता संपले असून विश्वचषक २०१९ पूर्वी १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांतच सराव होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...