बलात्कार प्रकरण / हैदराबाद प्रकरणाचे राज्यसभेत उमटले पडसाद, राजनाथ सिंह म्हणाले - आम्ही कठोर कायदा करण्यास तयार

  • बलात्कार प्रकरणातील दोषींना स्वाधीन करा - जया बच्चन

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2019 06:05:18 PM IST

दिल्ली - तेलंगणातील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणाचे सोमवारी राज्यसभेत पडसाद उमटले. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या की, हीच ती वेळ आहे जेव्हा लोकांना सरकारकडून स्पष्ट उत्तर हवे आहे असे मला वाटते. निर्भय आणि कठुआ बलात्कार प्रकरणात आतापर्यंत काय झाले हे सरकारने सांगायला हवे. याप्रकरणाशी संरक्षण खात्यातील लोकांनी उत्तर द्यायला हवे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बलात्कारातील दोषींना जनतेच्या स्वाधीन करायला हवे.


तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या घटनेमुळे संपूर्ण देश लज्जित झाला आहे. यामुळे सर्वांनाच ठेच पोहोचली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अशा घटनांवर लगाम लावण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी आपल्याला असा कायदा तयार करावा लागेल ज्यावर सभागृहातील सर्व सदस्य एकमताने मंजुरी देतील. सरकार कठोर कायदा करण्यास तयार आहे. या अमानुष कृत्यापेक्षा काहीही मोठे असू शकत नाही.


जे सुरक्षा देऊ शकत नाहीत अशांचे पितळ उघडे करणे गरजेचे - जया बच्चन

राज्यसभेतून बाहेर पडताना जया म्हणाल्या की, "सरकरा महिलांना सुरक्षा प्रदान करू शकत नसेल तर त्यांनी जनतेवर निर्णय सोपवावा. जे सुरक्षा देऊ शकत नाही आणि जे अपराध करत आहेत त्यांचे पितळ उघडे करणे गरजेचे आहे. यानंतर जनतेला त्यांचा निर्णय करू द्यावा"

X
COMMENT