आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही त्यांना सरेंडर करण्यास सांगितले, त्यांनी फायरिंग केली, कमिश्नर वीसी सज्जनार यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रकार परिषदेत सज्जनार यांनी उलगडला घटनाक्रम

हैद्राबाद(तेलंगाना)- महिला वेटरनरी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये खात्मा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यावर गोळी चालवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ही संपूर्ण घटना पाहटे 3 ते 6 दरम्यान झाली. मिळालेल्या माहितीनुसार चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिस चारही आरोपींना घटनास्थळावर घेऊन गेली आणि 'सीन ऑफ क्राइम' (रिक्रिएशन)चा तपास घेत होती. यादरम्यान, एका आरोपीने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. याबाबत पोलिस कमिश्नर सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.पोलिस कमिश्नर वीसी सज्जनर म्हणाले की, पोलिसांनी आरोपींना सरेंडर करण्यास सांगितले होते. पण, आरोपींनी फायरिंग केली. त्यानंतर पोलिसांनी ओपन फायरिंग सुरू केली आणि त्यात चार आरोपींचा खात्मा झाला. या चकमकित दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संपूर्ण घटनाक्रम
 
सज्जनार म्हणाले की, "रिमांडच्या चौथ्या दिवशी आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो, त्यांनी आम्हाला पुरावे दिले. त्यांनी सांगितलेले पुरावे शोधण्यासाठी आम्ही घटनास्थळावर आलो होतो, यावेळी आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्याच्या दोन बंदुका घेऊन फायरिंग केली. त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी फायरिंग सुरू केली. या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाला तर एक SI आणि कॉन्स्टेबल जखमी झाले."

बलात्कार आणि हत्या
 
27 नोव्हेंबर 2019 रोजी 26 वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शमशाबाद येथे तिला जाळण्यात आले. सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 4 आरोपींनी सुरुवातीला तिच्या स्कूटरचे मागचे चाक पंक्चर केले होते. यानंतर मदत करण्याचे ढोंग करून तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या दरम्यान पीडितेचा गुदमरून मृत्यू झाला आणि नराधमांनी तिचा मृतदेह त्याच ठिकाणी जाळला.